महाराष्ट्र राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत अमळनेर संघाचा प्रथम क्रमांक…

अमळनेर प्रतिनिधी मुंबई महाराष्ट्र राज्यस्तरीय ओपन कराटे स्पर्धा दिनांक 22 सप्टेंबर 2024 संपन्न झाल्या याचे उदघाटक शांताराम जाधव यांनी केलं.तर आयोजक भीमज्योत शेजवळ सर होते.

महाराष्ट्र राज्यस्तरीय ओपन कराटे स्पर्धेत एकूण 300 खेळाडूंनी सहभाग घेतला. यात अमरावती, बुलढाणा,परभणी,हिंगोली,वर्धा,धुळे,जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील अमळनेर संघाने प्रथम क्रमांक पटकावला. अमळनेरातील मास्टर करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या संघाने वर्चस्व कायम ठेवले व अंमळनेर संघाला प्रथम क्रमांक मिळाला

अमळनेर येथील यशस्वी झालेल्या खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे हरीष सोनवणे, अतुल सुरळकर, पूर्वेश मोराणकर, प्रतीक मोराणकर, अनिकेत पाटील, दक्ष पाटील, मल्हार सोनार, वेदांत वानखेडे, समन्तक देशमुख, कृष्णा गोसावी, स्वरांश सूर्यवंशी, अनय भांडारकर, सुदर्शन कोळी, प्रांजली इशी, पीहल पाटील, तेजस्विनी जाधव, हिंदवी निकम, स्वरा खेडकर, अनुश्री चौधरी, दिव्यानी पवार, प्रियांशी भदाणे, माही दाभाडे, भाविका शेटे, आराध्या ठाकूर, सुकेशनी सपकाळे आदींना मिळाले यश.

यशस्वी झालेल्या सर्व खेळाडूंचे व मास्टर सुनील करंदीकर सरांचे कौतुक सर्व स्तरावरून होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!