अमळनेर प्रतिनिधी, येथील दिनांक ०८ऑक्टोबर २०२४ रोजी विभागीय स्तरीय बास्केटबॉल स्पर्धा विभागीय क्रीडा संकुल परिसर स्व. मीनाताई ठाकरे इनडोअर हॉल, हिरावाडी रोड पंचवटी, नासिक येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.
यामध्ये नाशिक विभागातील सर्व शाळांनी सहभाग घेतलेला होता. त्यामध्ये सेंट मेरी इंग्लिश मीडियम हायस्कूल, मंगरूळ तालुका अमळनेरच्या १७ वर्षा आतील मुली या गटातील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत यश संपादन केले व तृतीय क्रमांक मिळवला. या सर्व खेळाडूंचे शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर जॉईस, मॅनेजर मदर डिव्हाईन यांनी गुलाब पुष्प देऊन सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले व क्रीडा शिक्षक कमलेश मोरे, किरण, शिंपी व कोच विक्की बैसाणे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
*सहभागी विद्यार्थिनी खेळाडूचां चंबू*
1)जान्हवी भामरे 2) श्रेयसी सोये 3) यज्ञा पाटील 4) मेघना मराठे 5) मानसी पाटील 6 )प्रांजली सोनवणे 7) नेहा वाल्हे 8 ) निकिता काकुलीत 9) जानवी पाटील 10) अपूर्वा पाटील 11) अनन्या पाटील 12) वैष्णवी पाटील.
या सर्व खेळाडूंचे सर्वच स्तरातून अभिनदनाचा वर्षाव होत आहे.