अमळनेर प्रतिनिधी,क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे ,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद जळगाव आयोजित शासकिय शालेय बाॕक्सींग जिल्हास्तरिय क्रीडा स्पर्धा जळगाव येथे उदयापासुन संपन्न होणार आहे. या स्पर्धेत जी एस हायस्कुल अष्टपैलु खेळाडू जयेश अमृत पाटील हा १७ वर्षाआतिल मुले ४६-४८वजन गटात खेळण्यास सज्ज झालेला आहे.वरिल खेळाडूने या अगोदर कुस्तीत सुध्दा प्राविण्य मिळवली आहे .
खा,शि.मं.चे कार्याध्यक्ष डाॕ संदेशजी गुजराथी,कार्यापाध्यक्ष भाऊसो निरजजी अग्रवाल ,संस्थेचे संमन्वय समिती चेअरमन डाॕ, अनिलजी शिदे ,शालेय समिती चेअरमन आण्णासो.हरि भिका वाणी ,खा.शि.मं.चे संचालक दादासाहेब योगेशजी मुंदडे संचालक भांऊसो प्रदीपजी अग्रवाल ,संचालक विनोद भैय्या पाटील ,संचालक कल्याणबापु पाटील , शिक्षक प्रतीनीधी विनोद कदम सर , मुख्याध्यापक आबासाहेब बी एस पाटील सर ,उपमुख्याध्यापक नानासाहेब ए डि भदाणे सर , पर्यवेक्षक श्री.एस आर शिंगाणे, पर्यवेक्षक सी एस सोनजे श्री,शाम पवार ,श्री.पंकज जैन सर व सर्व पदाधिकारीनी अभिनंदन करुन जिल्ह्यास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .
वरिल खेळाडूना क्रीडाविभाग प्रमुख व शिक्षक प्रतिनीधी एस पी वाघ सर व जे व्ही बाविस्कर सरांचे मोलांचे मार्गदर्शन लाभले.