अमळनेर प्रतिनिधी,तालुक्यात पावसाळी क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली आहे. विविध क्रीडा प्रकार घेतले जातात. तालुक्यातील शारदा माध्यमिक विद्यालय कळमसरे ह्या शाळेने ही त्यात विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. आता नुकत्याच झालेल्या व्हाॅलीबाॅल मुलीच्या 17 वर्षीय आतील सामन्यात तालुक्याच्या ठिकाणी साने गुरुजी हायस्कूल ला नमवत जिल्हास्तरावर निवड झाली आहे. मागच्या वर्षी तालुक्यात प्रथम असल्याने बाय मिळाला. त्याचा योग्य फायदा घेत मुलींनी अथक मेहनत घेऊन दुसऱ्या राऊंडसाठी डी. आर. कन्या शाळेशी सामना जिंकला. फायनल सामना साने गुरुजी शाळेशी होता. त्यात अचूक सर्व्हीस करत मुलींनी तो सामना जिंकून खेड्यातील मुली ह्या व्हाॅलीबाॅल खेळू शकतात हे दाखवून दिले. शारदा माध्यमिक विद्यालयात एकही क्रीडा शिक्षक नसतांना आर.जी. राठोड व एम. आर तडवी सरांनी मुलींमध्ये कौशल्य दाखवत सराव दिला. पावसाळा चालू असतांना कमी दिवसात मुलींनी सराव करीत हे यश मिळविले. हा सामना ललीता पाटील इंटरनॅशनल स्कूल मध्ये रंगला. दरवर्षीप्रमाणेच क्रीडा युवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या आयोजनाने तालुकास्तरीय सामने घेतले जातात. त्यातून जिल्हास्तरावर त्यांना पाठविले जाते. कळमसरे हायस्कूल मध्ये क्रीडा शिक्षक नसल्याने सुध्दा शिक्षक मंडळी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर तसेच कोणताच कोच न घेता विजय खेचून आणतात हे विशेष बाब आहे. तालुकास्तरीय व्हाॅलीबाॅल स्पर्धेच्या ठिकाणी क्रीडा समन्वयक एस. पी. वाघ सरांनी सूत्रसंचालन केले. स्पर्धेचे नियम सांगुन स्पर्धा उत्साहात पार पडली. सदर स्पर्धेत सहभागी मुलीत मानसी पवार, नताशा चौधरी, भूमिका सैंदाणे, रोशनी महाजन, प्रणाली सुतार, गायत्री सोनवणे, ग्रीष्मा राजपूत काजल गुरव, जयश्री चौधरी, पूर्वा चौधरी माधुरी पारधी इ. मुली होत्या. ह्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष महेंद्रलाल कोठारी, तसेच सर्व संचालक मंडळ,प्रशासकिय अधिकारी ,मुख्याध्यापक व सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थीनीचे स्वागत तसेच कौतुक केले. संचालक मंडळींनी यशस्वी मुली,प्रशिक्षक यांना घरी बोलवून पेढे भरविले.