अमळनेर प्रतिनीधी येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव यांच्या वतीने जनजातीय गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. आजच्या अमळनेर तालुक्यात नांद्री, महाराणा प्रताप चौक ते प्रताप महाविद्यालय अमळनेर यात्रा करण्यात आली व प्रताप महाविद्यालय आदी वेगवेगळ्या ठिकाणी या यात्रेचे स्वागत करण्यात आले.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये जसे शहरातील स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान होते अगदी त्याचप्रमाणे कमी संसाधनांमध्ये भारताच्या स्वातंत्र्यासाठी जनजातीय समाजातील अनेक क्रांतिकारकांनी आपल्या जीवाचे रान केले आहे यामध्ये इस्लामी आक्रमक यांच्या विरोधात लढलेल्या राणी दुर्गावती महाराणा प्रताप यांच्या सोबत लढलेले भिल्ल समाजातील योध्दे इंग्रजांच्या विरोधात बिरसा मुंडा तंट्या मामा भिल गुलाम महाराज राणी काजला आदी वीरांचा इतिहास या यात्रेच्या माध्यमातून सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ही जनजातीय गौरव यात्रा आयोजित केली आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित ही जनजातीय गौरव यात्रा जळगाव जिल्ह्यातील विविध १३ तालुक्यांमधील पन्नास गाव पाड्यांमध्ये जाणार आहे तसेच विविध ४५ शाळा/महाविद्यालय आणि २० वस्तीगृहांमध्येही जाणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून जनजातीय समाजामध्ये त्यांच्या इतिहासाबद्दल जागृती घडवून आणून विकसित भारताला आकारास आणण्यास जनजातीय समाजानेही आपले योगदान गरज अधोरेखित करणे असा यात्रेचा उद्दिष्ट आहे. “भारतीय संविधान आणि त्याद्वारे स्थापित मूल्य आरक्षण याबद्दलची नितांत श्रद्धा भारताच्या प्रत्येक नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे यावर कुठल्याही प्रकारची गदा येण्याची दूर दूर पर्यंत शक्यता नाही” असे प्रतिपादन विवीध ठिकाणी बोलताना धनंजय शेरकर यांनी केले.
या यात्रेच्या प्रसंगी मगण बाविस्कर, दिपक बाविस्कर, रावसाहेब पाटील, नरेंद्र पाटील, गोविंद सैदाने,कमलेश पाटील, प्रा.धीरज वैष्णव, प्रा डॉ तुषार राजाळे, डॉ सरोदे,प्रा डॉ डी डी राठोट, प्रा.बापू संदानशिव, सिनेट सदस्य दिनेश नाईक,अभिषेक पाटील,विभाग संघटन मंत्री धनंजय शेरकर,विभाग संयोजक भाविन पाटील, यात्रा मार्ग प्रमुख आदित्य जाधव, मुकेश बडगुजर, धीरज माळी, आदित्य चौधरी, जयेश सोनवणे अंकित पवार व दिगंबर कुंभार यांच्यासह अनेक नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.