अमळनेर प्रतिनीधी येथील समस्त माळी समाजाच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवाराला पाठिंबा बाबत जाहीर खुलासा करण्यात आला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या जाहीर खुलासा पत्रात क्षत्रिय कांच माळी समाज हा कष्ठकटी व स्वाभीमानी समाज असुन ह्या समाजाला खरेदी करणारा अजुन कोणीही जन्माला आलेला नाही व येणार ही नाही.माळी समाज हा नेहमी शास्वत् विकासाच्या सोबत राहीला आहे.अमळनेट मतदार संघातील सर्व इच्छुक उमेदवारां सोबत समाजाचे हित संबंध आहेत.
समाजाच्या सर्वसाधारण सभेत कोणासही जाहीर पाठिंबा देण्यात बाबत निर्णय झालेला नसून कोणत्याही संभाव्य उमेदवाराला लिखित पाठींबा दिलेला नाही.समस्त क्षत्रिय कांच माळी समाजाच्या सर्व इच्छुक उमेदवारांना शुभेच्छा आहेत.
तरी ह्या प्रसिद्ध पत्रकाद्वारे आम्ही सुचित करू इच्छितो की सोशल मीडिया वरील अफवांवर कोणीही विश्वास ठेऊ नये,अश्या आशयाचे आवाहन श्री क्षत्रिय कांच माळी समाज मंडळ अमळनेर यांनी केले आहे.