अमळनेर प्रतिनीधी येथे धावत्या रेल्वेतृून लहान मुलीच्या हातातून पडलेला मोबाईल रेल्वे पोलिसांनी ट्रॅक वर जाऊन शोधून प्रवाशाला केला परत.
सविस्तर वृत्त असे की,गोविंदा मिश्रा रा अमरोली सुरत हे दि २ ऑक्टोबर रोजी ताप्ती गंगा एक्स्प्रेसने सुरत हुन प्रयागराज जात होते.गोविंदा मिश्रा यांची चार वर्षाची भाची मोबाईल खेळत होती.अचानक तिचा मोबाईल हातातुन सटकून रेल्वे डब्याच्या बाहेर अमळनेर स्टेशन येण्याच्या आधी तीन किमी अंतरावर तिच्या हातातून ४२ हजाराचा मोबाईल पडला. रेल्वे अमळनेर स्टेशनवर गाडी येताच गोविंदा मिश्रा स्टेशन वर उतरले व त्याने त्याच्या कुटुबियांना पुढे रवाना केले आणि कर्तव्यावर असलेले पोलीस हेमंत ठाकूर व विपीन कुमार याना भेटून मोबाईल गाडी च्या बाहेर पडल्याचे सांगितले व सदर मोबाईल ज्या ठिकाणी पडला होता त्या ठिकाणचा त्याने खांबा क्रमांक ही सांगितला. त्यामुळे आरपीएफ ने सदर प्रवाश्यांला सोबत नेत दोन्ही पोलिसांनी रेल्वे ट्रॅक वर जाऊन मोबाईल शोधला आणि सन्मानाने प्रवाशाला परत
केला. या ठिकाणी आर पी एफ पोलिसां मधील माणुसकी बघायला मिळाली.कारण सदर पोलिस कर्मचाऱ्यांनी तीन किमी मागे जंगलात जाऊन मोबाईल शोधला. या बद्दल सदर प्रवाश्याने त्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांचे मनापासून जाहीर आभार मानले.
पीएसआय कुलभूषण चौहान….
प्रवाश्यानी प्रवास करतांना आपल्या जीवा सह मौल्यवान वस्तूच्या सुरक्षा बाबत दक्ष राहावे.धावत्या रेल्वेतून आपले डोके अथवा हात बाहेर काढू नये,त्यास इजा पोहचू शकते.