आजच्या गुणवतांन कडून येणाऱ्या पिढीला प्रेरणा मिळेल – सुनील नंदवाळकर, उपविभागीय पोलिस अधिकारी  अमळनेर येथे बौद्ध समाज मंच तर्फे गुणवंतांचा सत्कार समारंभी केले मार्गदर्शन

अमळनेर शहर प्रतिनिधी,भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अमळनेर येथे बौद्ध समाज मंच आयोजित गुणवंतांचा सत्कार समारंभ लाॅयन्स हॉल येथे संपन्न झाला.

कार्यक्रमात प्रथम उपस्थित मान्यवरांनी तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुष्पहार अर्पण करुन पूजन केले.

 

उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर, पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्या हस्ते समाजातील गुणवंत विद्यार्थी सह व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.याप्रसंगी उपस्थित समुहाला संबोधित करताना

उपविभागिय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, अमळनेरात बारा जन पीएचडी धारक असल्याचा आनंद होत आहे.इतक्या मोठ्या प्रमाणात उच्च विद्याविभूषित प्रगल्भ लोक ज्या समाजात आहे त्या समाजाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. तसेच नेट सेट परीक्षेत यश संपादन केलेले,शालेय शिक्षणात चांगले गुण प्राप्त विद्यार्थी व आप आपल्या उद्योग धंद्यात स्वबळावर उच्च शिखर गाटलेले पाहून अभिमान वाटतो.आजचे सर्व गुणवंत सत्कार मूर्ती हे उद्याच्या येणाऱ्या पिढीला नक्कीच प्रेरणादायी ठरेल.आयोजकांनी खूप सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केल्याने त्यांचे कौतुक करतो.

याप्रसंगी मा.नगरसेवक नरेंद्र संदानशिव, बाळासाहेब योगराज संदानशिव, मा.गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे, भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्षा मंगलाताई सोनवणे, रिपब्लिकन पार्टी तालुकाध्यक्ष यशवंत बैसाणे, प्रोटान शिक्षक संघटना राज्य उपाध्यक्ष कमलाकर संदानशिव, वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष दाजीबा गव्हाणे, नपा इंटकचे सोमचंद संदानशिव, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर निकम, मा.केंद्रप्रमुख विमलताई मैराळे, भिम आर्मीचे तालुकाध्यक्ष प्रविण बैसाणे, प्रा.अशोक पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

प्रमुख अतिथींचे स्वागत या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष समाधान मैराळे, सुनिल वाघ सर, हृदयनाथ मोरे,मिलिंद निकम,अतुल डोळस आदींनी मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद निकम, प्रास्ताविक अतुल डोळस तर आभार प्रदर्शन सुनील वाघ यांनी केले.

याप्रसंगी प्रा.भानुदास गुलाले, सोपान भवरे प्रा.डॉ.राहुल निकम, प्रा.डॉ.भगवान भालेराव, प्रा.डॉ.हर्षवर्धन जाधव, प्रा.डॉ.चंद्रकांत नेतकर, प्रा.डाॅ.विजयकुमार तुंटे, प्रा.डॉ.विजय खैरनार, प्रा.डाॅ.विजयकुमार वाघमारे, प्रा.डॉ.विजय गाढे, प्रा डॉ सुजाता निकम,प्रा.डाॅ.हर्षल नेतकर, प्रा.डाॅ.माधव भुसनार मा.केंद्रप्रमुख चिंधू वानखेडे, डॉ.सिद्धार्थ सैंदाणे, मंगरूळ विकास सोसायटीचे उपाध्यक्ष अरुण घोलप, बामसेफ तालुकाध्यक्ष दिपक बिऱ्हाडे, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा संघटक सिद्धार्थ सोनवणे, समता शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष व पत्रकार अजय भामरे, एसटी वाहतूक नियंत्रक विजय वाडेकर, रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष ॲड.अभिजित बिऱ्हाडे, देवदत्त संदानशिव, मनिष उघडे, किरण चव्हाण,बापुराव ठाकरे, डी.ए.पाटील,प्रमोद बिऱ्हाडे, पत्रकार आत्माराम अहिरे, भूपेंद्र शिरसाठ, अविनाश बिऱ्हाडे, सुनिता मोरे, अनिता संदानशिव, गौरव सोनवणे, राहुल बिऱ्हाडे या सह अनेक महिला,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🔅🔆💫〽️n💫🔆🔅

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!