खूनी हल्ला केल्या प्रकरणी माजी सरपंच सह दोघांवर गुन्हा दाखल मुसळी गावा जवळ घडली घटना 

 

 

अमळनेर प्रतिनिधी,येथील सुंदरपट्टी गावाचे माजी सरपंच सुरेश पाटील यांच्या मुलावर पूर्ववैमनस्यातून जीवन घेना हल्ला पाळधी तालुका धरणगाव मुसळी गावाजवळ जुन्या वादातून करण्यात आला असून त्यात तो जखमी झाल्याची घटना घडली आहे.

जून्यावादातून सदर खुनी हल्ला करण्यात आल्याचे बोलले जात आहे.गोपाल नामक जखमी हा सुंदरपट्टी चे माजी सरपंच तथा सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष सुरेश पाटील यांचा मुलगा आहे.यांचे सात्री येथील महेंद्र बोरसे यांच्या सोबत भांडण झाल्याने पोलिसात गुन्हा दाखल आहे.त्याच गुन्ह्यात जखमी गोपाल हा न्यायालयीन कस्टडीत होता.त्याला त्या दिवशीच जामिनावर सोडले होते.मित्रासह मोटरसायकलवर घरी येत असताना मुसळी येथे हल्ला झाल्याची तक्रार किशोर पाटील ता.अमळनेर ह. मु.उधना ( सुरत)यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार ते आणि गोपाल उर्फ उमाकांत सुरेश पाटील व शोएब असे तिघे मो. सा. क्र. एम एच १९ सी एम ७७९७ ने धरणगाव कडे जात होते.मुसळी गावाजवळ स्पीड ब्रेकर आल्याने गाडीचा वेग कमी झाला याचा फायदा घेत सात्री ता.अमळनेर चे माजी सरपंच महेंद्र शाळिग्राम बोरसे यांनी व त्यांच्या सोबत असलेले दोन अनोळखी व्यक्ती यांनी मध्ये बसलेला भाचा गोपाळ यांचेवर चाकू सारख्या हत्याराने मागील भांडणावरून वार करून त्याला जबर जखमी केले. चाकु हल्ला केल्या नंतर आरोपी पळून गेले.या बाबत पाळधी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो. नि.पवन देसले यांचा मार्गदर्शनाखाली स. पो. नि.प्रशांत कंडारे आदि करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!