अमळनेर प्रतिनिधी, येथील धुळे महामार्गावर दोन तरुण संशयित रित्या रात्री आढळून आल्याने पोलिसांनी पाठलाग करून पकडले असता घरफोडी करीता लागणाऱ्या वस्तू त्यांच्या जवळ असल्याचे दिसून आले.
सविस्तर वृत्त असे की,रात्रीच्या गस्ती पथकातील पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण कुमावत हे रात्री गस्त घालत असताना त्यांना धुळे रोडवर दोन तरुण संशयित हालचाल करतांना दिसल्याने विचारपूस साठी त्यांच्या जात असताना त्या दोघांनी मोटरसायकलने धुळ्या कडे पळ काढला मात्र पोलिस पथकाने पाठलाग करून चकवा देणाऱ्या दोघा संशयित व्यक्तीनां धुळ्याकडे पळ काढताना रामकृष्ण कुमावत यांनी त्यांना पकडले. त्यांची विचारपूस केली असता त्यांनी आपली नावे रितेश संजय देवरे,रा मोचीवाडा मोगलाई साक्री रोड धुळे व वैभव प्रकाश म्हस्के, नकाणे धुळे असल्याचे समजले. पोलिसांनी तपासणी केली असता त्यांच्या जवळ कडी कोंडा कापणारी कटर पट्टी,नट बोल्ट उघडण्याचा पाना असे साहित्य आढळून आले. दोघे तरुण घरफोडी व चोरी करण्याच्या उद्देशाने आले असल्याचा संशय व्यक्त करून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला.पुढील तपास हेडकॉन्स्टेबल अशोक साळुंखे करीत आहेत.