पारोळा प्रतिनिधी, येथील एका एल्यूमिनियम तार चोरी करणाऱ्या सराईत टोळीला पकडण्यात पारोळा पोलिसांना यश मिळाले आहे.
सविस्तर वृत्त असे की,पारोळा पोलिस निरीक्षक सुनील पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पारोळा एरंडोल हद्दीत सांगवी शिवारात आयलुमिनियम तार चोरीला जात असल्याचे कळाले असता त्या चोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी त्यांनी आपले सहकारी उप नि राजू जाधव,पो हे.प्रवीण पाटील,पो हे सुनील हटकर,पो ना आशिष गायकवाड यांना योग्य ते मार्गदर्शन करून कामी लावले.
सदर तपास पथकाने चोरी झाल्याच्या ठिकाणी भेट दिली असता आरोपी समाधान नारायण पाटील राहणार एरडोल हा आपल्या ताब्यातील वाहन क्रमांक एम एच १९ वाय ११९२ असलेल्या वाहनासह एका रोहत्र जवळ मिळून आला.त्यास पथकाने विचारपूस केली असता त्याने उडवा उडविचे उत्तर दिल्याने त्यास खाकीचा धाक दाखवला असता त्याने गुन्हा कबूल करत अजून दोन साथीदार ज्यात रवींद्र अनिल मिस्तरी व धनराज प्रकाश ठाकूर असल्याचे सांगून ते पळून गेल्याचे सांगितले.या बाबत पोलीस पथकाने आपली यंत्रणा कामी लावत त्यांनही ताब्यात घेतले,असल्याचे पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
पोलिस निरीक्षक सुनील पवार सह शोध पथकातील उप नि राजू जाधव,पो हे.प्रवीण पाटील,पो हे सुनील हटकर,पो ना आशिष गायकवाड आदींचे सर्वत्र कौतुक होत आहे.