अमळनेर प्रतिनिधी येथील चौबारी गावात एका चारचाकी वाहनाने रस्त्यावरून चालणाऱ्या मुलीस धडक दिल्याने जागीच मृत्यू.
सविस्तर वृत्त असे की,तोरणमाळ येथील मूळ रहिवासी विजय नाईक हा आपल्या कुटुंबासह चौबारी येथील बाळू पाटील यांच्या शेतात मोल मजुरी करीत आहे.काल संध्याकाळी त्याची पत्नी संगीता व मुलगी रखमा वय वर्ष आठ ही पाणी घेण्यासाठी पाडसे कडील विहिरी वर रस्त्याच्या कडेने जात असताना पाडसे कडून चौबारी च्या दिशेने जाणाऱ्या चारचाकी ने रखमा नामक मुलीस धडक देऊन पळ काढला असता गावतील ग्रामस्थांनी सदर गाडीचा पाटलाग करून अमळनेर शहरातील मंगलमूर्ती चौकात सदरची गाडी अडवून मारवड पोलिस ठाण्यात जमा केली.दरम्यान जखमी रखमा हिस उपचारासाठी अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.सदर वाहन चालका विरोधात मारवड पोलिस ठाण्यात विजय नाईक यांनी तक्रार दाखल केली असून बी एन एस २०२३/१०६(१), मोटर वाहन अधिनियम १९८८/१८४,१३४(A)(B) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास हेड कॉन्स्टेबल शरीफ पठाण हे करीत आहेत.