अमळनेर प्रतिनिधी,येथील सूंदरपट्टी येथील माजी सरपंच सुरेश पाटील यांचां मुलगा गोपाळ वर काही दिवसापूर्वी जीवघेणा हल्ला प्रकरणी सात्री गावचे माजी सरपंच महेंद्र बोरसे सह तीन जणांवर गुन्हा दाखल केला होता.त्या दिवसा पासून महेंद्र बोरसे फरार आहे.
सविस्तर वृत्त असे की,सात्री गावाचे माजी सरपंच महेंद्र बोरसे सह तीन जणांवर गेल्या काही दिवसांपूर्वी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सुंदरपट्टी येथील माजी सरपंच सुरेश पाटील यांचा मुलगा गोपाल पाटील यावर चाकू हल्ला झाल्याने हा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील आरोपींचा पोलीस शोध घेत होती. यातील 3 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली तेव्हा या गुन्ह्यातील आरोपींनी कबूल जबाबात सात्री गावाचे माजी सरपंच महेंद्र बोरसे व त्याचा भाऊ विनोद बोरसे या दोघांनी आम्हाला गोपाल पाटील यास मारण्यासाठी सांगितले.अटक आरोपींनी दिलेल्या कबुली जबाब नुसार सात्रीचा पोलीस पाटील विनोद बोरसे याचे देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान गुन्हा दाखल झाल्यापासून महेंद्र बोरसे व त्याचां भाऊ विनोद बोरसेचे नाव गुन्ह्यात आल्यापासून फरार आहे.त्यांना त्वरित अटक करण्याची मागणी सुरेश अर्जुन पाटील यांनी केली आहे.