अमळनेर प्रतिनिधी,ओबीसी समाजाच्या चळवळीचा आवाज महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांचे विश्वासू अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष अँड सुभाष राऊत साहेब (बीड) यांच येथे आज दिनांक १४ सप्टेंबर शनिवार रोजी संध्याकाळी ५:०० वाजता दौऱ्या निमित्त आगमन होणार आहे तरी ते अमळनेर येथील पिंप्री गल्ली (माळीवाडा) येथे सदिच्छा भेट देणार असून
सर्व समाज बांधव, समता सैनिक,मित्र परिवार यांच्याकडून स्वागत व सत्कार करण्यात येणार आहे तरी सर्व समाज बांधव, पदाधिकरी , समता सैनिक यांनी जास्तीत जास्त संख्येने स्वागतसाठी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे