अमळनेर : वाळू वाहतूक ची माहिती अधिकाऱ्यांना देतो म्हणून कळमसरे येथील वाळू तस्कर यांनी तांदळी गावातील एकाला चाकूने व इतर दोघांना चापटा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना २२ रोजी रात्री साडे दहा वाजता पडावद फाट्यावर सार्वजनिक जागी घड़ली.
निलेश प्रतापसिंग परदेश हा २२ ऑक्टोबर रोजी बेटावद येथे खाजगी कामाला गेला होता.मोटरसायकलने परत येत असताना पडावद फाट्याजवळ चेतन राजपूत ,नईम पठाण,साहिल पठाण तिघे रा कळमसरे यांनी त्याला अडवून तू आमचे वाळू ट्रॅक्टर बाबत तलाठी व पोलिसांना माहिती देतो.तुला आता संपवूनच टाकतो म्हणून शिवीगाळ करू लागले.त्यावेळी निलेश ने शहापूर आणि जैतपिर येथील त्याचा पुतण्या आणि मित्रांना बोलावले.त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला तरी तिघे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.वादावादित चेतन राजपूत याने निलेश च्या मांडीला चाकू मारला तर निलेशचां पुतण्या कुणाल उदयसिंग परदेशी आणि मित्र भूषण विक्रमसिंग परदेशी यांनाही चापट बुक्क्यांनी मारहाण केली. घटास्थळावर उपस्थित लोकांनी सोडवा सोडव करून निलेशला उपचारासाठी अमळनेर येथील ग्रामिण रुग्णालयात दाखल केले.तेथून पुढील उपचारासाठी धुळे येथे पाठवण्यात आले.उपचार घेऊन परत आल्यावर मारवड पोलीस स्टेशनला वाळू तस्कर तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल सचिन निकम करीत आहेत.