अमळनेर, – शहरात दोन धर्मात वाढत्या गुन्ह्यांच्या घटनांना पाहता,तसेच काल गणेश विसर्जन वेळी झालेला वाद पाहता पोलिसांनी शहरातील सुरक्षा व्यवस्था अधिक चांगली करण्यासाठी रुटमार्च काढण्याचा निर्णय घेतला आहे. सहाय्यक पोलिस अधीक्षक कविता नेरकर, पीआय विकास देवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर रुटमार्च हा झामी चौक,वाडी दरवाजा,सराफ बाजार,तिरंगा चौक,सुभाष चौक ते गांधलीपुरा चौकी पर्यंत करण्यात आला.
रुट मार्च झाल्या नंतर गांधलिपूरा पोलिस चौतिक एएसपी कविता नेरकर मॅडम यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की,
पोलिसांचा रुटमार्च: शहरात सुरक्षा वाढविण्याचे प्रयत्न “शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेची हमी देण्यासाठी हा रुटमार्च काढला आहे. या रुटमार्च द्वारे पोलिसांची उपस्थिती शहरातील सर्व भागात जाणवेल आणि गुन्हेगारांना धरपकड करण्यात सुलभता होईल.सर्वांनी भयभीत नहोता आनंदाने आप आपले सण उत्सव साजरे करावे,कोणालाही इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.शांतता भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.शहरातील वातावरण पाहता कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.”