अमळनेर प्रतिनिधी येथील जळोद अमळगाव शिवारात दुचाकीला कट मारल्याच्या वादातून एकाचामा रहाणीत मृत्यू झाल्याची घटना घडली.
सविस्तर वृत्त असे की, आम्लेश्वर नगर मधील रहिवाशी विकास पाटील हा तरुण मित्रांसह पिंगळवाडे येथे
तमाशा पाहण्यासाठी गेला होता. रस्त्याने जात असताना एकाने मोटर सायकला कट मारल्यावरून इंडिकेटर तुटले. त्यावरून दोन्ही गटात अमळगाव जळोद रस्त्यावर वाद विकोपाला गेला व त्याचे रूपांतर हाणामारी झाल्याने त्यात विकास पाटील या तरुणाचा मृत्यू झाला.सदरची घटना दि.३ रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास घडली असल्याचे कळत. घटनेची माहिती मिळताच मारवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीभाऊ पाटील, हेकॉँ संजय पाटील यांनी घटना स्थळी धाव घेतली व विकास पाटील याचे शव विच्छेदनसाठी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे.सदर घटनेतील आरोपी हे फरार झाल्याने मारवड पोलीस आरोपींचा शोध घेत आहे .