बलिप्रतिपदा दिनी “इडा पिडा टळो ! बळीचं राज्य येवो !” घोषणांसह मिरवणूक संपन्न…

 

अमळनेर प्रतिनिधी, येथील बळीराजा लोकसत्व समितीच्या वतीने बलिप्रतिप्रदा निमित्त सालाबाद प्रमाणे महात्मा बळीराजाची व सजवलेल्या नांगराची बैलगाडीवरून सवाद्य मिरवणूक अमळनेर शहरातून काढण्यात आली.


अमळनेर येथील शिरूर नाका परिसरातील जय अंबे मित्र मंडळ चौकात महात्मा बळीराजा यांच्या प्रतिमेसन छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ व महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सजवलेल्या बैलगाडीवर भव्य मोठे असे लाकडी नांगर आणि महात्मा बळीराजाची भव्य प्रतिमा ठेवलेली होती. बैलगाडी पुढे बँडची गाडी आणि विविध सामाजिक चळवळीमधील प्रमुख कार्यकर्ते व महिला युवक चालत होते. चौका चौकात महिलांनी बळीराजाचे व नांगराचे पूजन केले. इडा पिडा टळो ! बळीचं राज्य येवो ! अशा घोषणांसह विविध शेतकरी गीतांनी सदर मिरवणूक शिरूर नाका परिसर वड चौक वाघ बिल्डिंग त्रिकोणी बगीचा पाचपावली देवी मंदिर बस स्टॅन्ड विश्रामगृहमार्गे बळीराजा स्मारक पर्यंत शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निघाले. बळीराजा स्मारक येथे सदर मिरवणुकीचा समारोप बळीराजाच्या शिल्पास भव्य पुष्पा पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. यावेळी सुभाष पाटील यांनी शिवकालीन काठीचे कर्तब ताशांच्या गजरात दाखविले.
मा. जि प सदस्या जयश्री पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अशोक आधार पाटील यांचे हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. शेतकरी व कृषी संस्कृतीचे प्रतीक असलेल्या नांगराची पूजा कृ उ बा संचालक प्रा सुभाष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सदर मिरवणुकीत ठिकठिकाणी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांनी शेतकरी गीते गायलीत.जिजाऊ वंदना अर्बन बँक संचालिका वसुंधरा लांडगे यांनी गायली तर मिरवणुकीचे सूत्रसंचालन व्हाईस चेअरमन रणजित शिंदे यांनी केले .आभार प्रदर्शन पाटील यांनी केले.
याप्रसंगी सदर मिरवणुकीत माजी नगरसेवक विनोद कदम, विक्रांत पाटील, उद्योजक प्रशांत निकम,ज्येष्ठ मार्गदर्शक मनोहर निकम, प्रा .अशोक पवार, मा.उपसभापती धनगर पाटील,ठेकेदार दिलीप पाटील, गावरानी जागल्या सेनेचे प्रमुख विश्वास पाटील, कृ उ बा संचालक समाधान धनगर,नगरसेवक श्याम पाटील,सयाजीराव पाटील , शिवमती वैशाली शेवाळे, प्रा.डॉ.विलास पाटील, अशोक पाटील, उद्योजक दिपक पाटील, रविंद्र पाटील, शरद पाटील, अनिल पाटील,श्रीकांत चिखलोदकर, मा.सरपंच सुरेश पाटील,महेश पाटील,सु. तु पाटील व पत्रकार बंधू आदिसह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक जय अंबे मित्र मंडळ व तरुण कुढापा व सप्तशृंगी , शिवकॉलनी मित्रपरिवार सोबत मराठा सेवा संघ , संभाजी बिग्रेड , जिजाऊ ब्रिग्रेडचे कैलास पाटील,दिलीप बाळू पाटील, बाळू पाटील , प्रेमराज पवारसर , रवि पाटील , सुनिल मराठे , शिवाजी पाटील , नवल पाटील , मधू पाटील , गुलाब पाटील , अमृत पाटील कुलदिप पाटील अमोल पाटील , संजय पाटकरी , प्रमोद पाटकरी , संजय पाटील अनिल शेटे , प्रदिप पाटील , भरत आबा आदिंसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!