*दिपावली 🪔निमित्ताने* 🪄🪔🪄🪔🪄🪔🪄🪔🪄 *…मोती साबणाचा जन्म…* ⚪🔴🟢🟡🔵🔴🟢🟡⚫

 

*दिपावली 🪔निमित्ताने*
🪄🪔🪄🪔🪄🪔🪄🪔🪄

*…मोती साबणाचा जन्म…*
⚪🔴🟢🟡🔵🔴🟢🟡⚫

 

तेलात स्थिरावल्यावर टाटांनी साबणाकडे लक्ष द्यायचे ठरवलं. तोपर्यंत भारतात आपापल्या घरी बनवलेल्या साबणापासुन..
म्हणजे *बेसनपीठ + दुध* याच्या मिश्रणातून अंघोळी व्हायच्या.

अंगणात, विहीरीकाठी अंघोळ करणारे कधीकधी पाठ घासायला *नारळाची शेंडी* वापरत होते.
🫢

*साबण* म्हणून असे काही असते हे माहीती नव्हते. वास्तविक १८७९ च्या काळात उत्तरेत ‘मिरत’ च्या आसपास पहिला साबण बनल्याची नोंद सापडते. पण त्याचा तो प्रसिध्द झाला नाही..

अंघोळीची अशी तऱ्हा होती. कपड्यांच्या साबणाचाही तर काही विषय नव्हता. १८९५ ला कलकत्ता येथील बंदरात इंग्लंडहून पहिला साबणसाठा आपल्याकडे आला, *सनलाईट सोप* नावाचा. त्यावर लिहलं होतं, मेड इन इंग्लंड बाय लिव्हर ब्रदर्स..

हा सनलाईट फार लोकप्रिय झाला आणि ती कंपनीही. लिव्हर ब्रदर्स म्हणजे आत्ताची हिन्दुस्थान लिव्हर, ही कंपनी भारतात आली सनलाईट या साबणावर स्वार होऊन.

या लिव्हर कंपनीने नंतर डालडा आणला, वनस्पती तुप. आणि भारतात ऐसपैस हातपाय पसरले. टाटांनी जेव्हा भारतीय बनावटीचा साबण बाजारात आणायचे ठरवले तेव्हा लिव्हर कंपनीने त्यांना कडवा विरोध केला. एक तर तो काळ स्वदेशीचा होता. टाटा आपल्या जातिवंत उद्यमशिलतेनं नवनवी आव्हान पेलतं होते. वीज आली होती, पोलाद निर्मितीसाठी शोध चालु होते. पहिले पंचतारांकित हाँटेल ताज च्या रुपाने उभे होते. नागपुरात एम्प्रेस होती तर मुंबईत स्वदेशी जोरात सुरु होती.

आता साबणातही ‘टाटा’ उतरले तर आपले नुकसान होणार हा अंदाज त्यांना आला होता.

*टाटा दर्जाच्या बाबतीत तडजोड करणार नाही हे ही ठाऊक होते.* टाटांना आव्हान द्यायचे असेल तर ते फक्त किंमतीच्या पातळीवरच देता येईल हे ते जाणून होते. टाटांनाही हि कल्पना होती. त्यामुळं टाटांनी आपला साबण बाजारात आणला तो लिव्हर च्या किंमतीत..
*१० रुपयांना १०० वड्या..*

नावही ठरलं..*५०१..बार*

या नावामागेही एक कथा आहे. टाटांना स्पर्धा होती लिव्हरची. लिव्हर ही कंपनी मुळची नेदरलँडची ती झाली ब्रिटिश. टाटांना आपल्या साबणात ब्रिटिश काहीच नको होतं.लिव्हरची स्पर्धा होती, फ्रान्समध्ये तयार होणाऱ्या साबणाची आणि त्या साबणाच नाव होतं ५००. ते कळाल्यावर कंपनीचे प्रमुख जाल नवरोजी म्हणाले. मग आपल्या साबणाचे नाव ५०१.
कारण त्यांच्या रक्तातच स्वदेशी होत, *त्यांचे आजोबा होते दादाभाई नवरोजी.*

बाजारात आल्यापासून या साबणाचा चांगला बोलबाला झाला. त्यामुळे लिव्हरने सनलाईटची किंमत ६ रुपयांना १०० अशी कमी केली. त्यात त्यांचा तेलाचा खर्च ही निघत नव्हता. टाटांच्या साबणाला अपशकुन करण्यासाठी त्यांची ही चाल होती. टाटा बधले नाही, किंमत कमी केली नाही, तीन महीन्यांनी लिव्हर ने परत सनलाईटची किंमत पहील्यासारखी केली.टाटा या स्पर्धेत तरले. या कंपनीने पुढे अंघोळीसाठी *हमाम…* तर दिवाळीसाठी जो आजही मोठ्या उत्साहानं वापरला जातो. त्या *मोती साबणाची निर्मिती केली.*

*इतिहास विषय नावडीचा असला..तरी देशाभिमान महत्वाचा..*
*म्हणून दिवाळी निमित्त करून ही पोस्ट महत्त्वाची।।*

*दीपावली निमित्ताने सगळा आनंद, सगळे सौख्य, सगळ्या स्वप्नांची पूर्तता, यशाची सगळी शिखरे, सगळे ऐश्वर्य हे आपल्याला मिळू दे…*

*हि दीपावली आपल्या आयुष्याला एक नवा उजाळा देऊ दे .*

*दीपावली निमित्त आपणास व आपल्या परिवारास लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा!*
🎊✨🎇🪔🎉💞🌹

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!