अमळनेर प्रतिनिधी, येथील प्रबुद्ध विहारात भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेच्या वतीने वर्षावास या धम्म कार्यक्रमाची सांगता झाली.
सविस्तर वृत्त असे की,बौद्ध धम्मात पावसाळ्याच्या कालावधीत शहरातील प्रबुद्ध विहार येथे बौद्ध विहारात धार्मिक विषयावर आषाढी पौर्णिमेला प्रवचन मालिका सुरुवात झाली व तिची सांगता आश्विन पौर्णिमेला झाली.या प्रवचन मालिकेत एकूण एकोणाविस विषयावर प्रवचन घेण्यात आले.
सदर वर्षावासचा शेवट बौद्ध धम्मातील अतिशय महत्वाचे कलाम सूत्त व मानवी मुक्तिचा जाहीरनामा या विषयावर बौद्धचार्या आयु.किरन नेतकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून केला.
या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभा महिला जिल्हाध्यक्ष मंगलाताई सोनवणे,जिल्हा सरचिटणीस प्रमिलाताई ब्रम्हे,जिल्हा कोषाध्यक्ष सविताताई गाढे,पर्यटन प्रचार उपाध्यक्षा लताताई वानखेडे,जिल्हा संघटीका नालिनिताई संदानशिव,धरणगाव तालुका अध्यक्ष सुशीला केदारे,पुरुष विभागाचे संस्कार उपाध्यक्ष सिद्धार्थ सोनवणे, चांदणी कुऱ्ह येथील मैराळ,रामोशी साहेब,आंबापिंप्री येथील संदानशिव, डॉ खाडे या सह शहरातील विविध कॉलनी परिसरातील उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.