नंदुरबार प्रतिनिधी, येथील नवरात्रीच्या पावन पर्वाचे औचित्य साधत येथील हिंदु सेवा सहाय्य समिती आणि लताई आरोग्य धाम यांच्या संयुक्त विद्यमाने १०९ कन्यांचे कन्यापूजन करून कन्याभोजन देण्यात आले तसेच कपडे, शालेय साहित्य भेट म्हणून मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. पुढील वर्षी २०९ कन्यापूजन करणार असे हिंदु सेवा सहाय्य समितीचे डॉ नरेंद्र पाटील यांनी जाहीर केले.
मोठा मारुती मंदिर सभागृहात आयोजित कन्यापूजनाची सुरुवात श्री दुर्गामातेचा महाआरतीने करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, भागवतकार हभप खंगेंद्र महाराज बुवा, भागवतकार हभप अविनाश महाराज जोशी, डॉ गौरव तांबोळी, डॉ स्वप्निल महाजन, शिक्षण मंडळाचे भावेश सोनवणे, इंजिनिअर कुणाल फटकाळ, ऍड अनिल लोढा, विलास जोशी उपस्थित होते. नगर पालिका शाळेतील १०९ कन्यांचे कन्यापूजन मान्यवर आणि यजमान, मारवाडी ब्राम्हण महिला मंडळ, भामरे ऍकेडमीचा भगिनी यांचा हस्ते करण्यात आले, कन्यापूजन सर्व कन्यांचे वैदिक मंत्र घोषात पाद्यपूजन करून विधिवत पूजन करण्यात आले. यानंतर सर्व १०९ कन्यांना नवीन कपडे, शालेय उपयोगी भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. प्रास्ताविकातुन हिंदु सेवा सहाय्य समितीचे डॉ नरेंद्र पाटील यांनी नवरात्रीत कन्यापूजन करण्याचे महत्त्व विशद केले व पुढच्या वर्षापासून २०९ कन्यांचे कन्यापूजन करणार असल्याचे जाहीर केले. राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल ऍड अनिल लोढा यांचा समितीचा वतीने विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी वंदनीय उपस्थिती लाभलेले खंगेंद्र महाराज यांनी आशिर्वचनात सांगितले की, नारी ही शक्तीस्वरूप आहे, स्त्री शक्ती ज्याचा मागे तो यशस्वी आहे. भारतातल्या प्रत्येक दुर्गापर्यंत पोहचण गरजेचे आहे त्याचा एक प्रयत्न म्हणून आजचा हा १०९ कन्यांचा कन्यापूजन आहे. मुलींचा अंगावर सात्विक कपडे, आभूषणे शोभून दिसतात मुलींनी हिंदु संस्कृतीप्रमाणे आचरण करावे. आशिर्वचनात अविनाश महाराज यांनी नवरात्रीत कन्यापूजनाचे महत्व विशद करून हिंदु सेवा सहाय्य समितीचे धर्मकार्य उत्तरारोत्तर वाढत जावो अश्या शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमात संघटनेची प्रार्थना जागृती पाटील हिने केली. वैदिक मंत्रघोष अविनाश महाराज जोशी, महाआरती विलास महाराज जोशी, सुत्रसंचालन राजू चौधरी यांनी केले. कन्यापूजन सोहळ्याची सांगता महिषासुरमर्दिनी स्तोत्र म्हणत १०९ कन्यांवर पुष्पवृष्टी करून करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी हिंदु सेवा सहाय्य समितीचे धर्मसेवक आणि लताई आरोग्य धामचे विश्वस्त यांनी परिश्रम घेतले.