अमळनेर प्रतिनिधी, मांडळ येथील आझाद चौकात दुर्गा उत्सवात एक अत्यंत स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. या वर्षी दुर्गा मातेच्या आरतीचे मान गावातील वयोवृद्ध जोडप्यांना देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी 6 वयोवृद्ध जोडप्यांच्या हस्ते आरती करण्यात आली,या दुर्गा उसत्व कार्यक्रमाचे अध्यक्षपद राज जितेंद्र पाटील व उपाध्यक्षपद सागर भगवान धनगर आहेत तर खजिनदार धीरज सुनील मराठे, सचिव भूषण राजेंद्र मराठे, किरण गोविंदा चव्हाण, किरण संतोष पाटील आणि वैभव नाना धनगर हे दुर्गा उत्सव कार्यक्रमाचे प्रमुख पदाधिकारी होते.
गावातील आझाद चौक दुर्गा मित्र मंडळ दरवर्षी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून गावात एक आदर्श वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असते. या वर्षी देखील वयोवृद्धांना प्राधान्य देऊन या उपक्रमाद्वारे समाजात वयोवृद्धांबद्दल आदरभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी वयोवृद्ध जोडप्यांनी मंडळाचे आभार मानले आणि गावातील नागरिकांनी त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.