अमळनेर येथील राष्ट्रसंत गाडगे बाबांच्या 68 व्या
पुण्यतिथी निमित्त युवा परीट धोबी मंडळ व परदेशी धोबी समाज आणि जीवन श्री व जीवन ज्योती ब्लड बँक अमळनेर’ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
गोपाला गोपाला देवकीनदंन गोपाला या भजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम संत गाडगेबाबा उद्यानात श्री संत गाडगे बाबा यांच्या स्मारकाचे व नंतर संत गाडगेबाबा चौकातील स्मारकाचे पूजन व पुष्पहार अर्पण अमळनेर नगरीचे माजी उपनगराध्यक्ष चंदूसिंग परदेशी, माजी नगरसेवक परशुराम महाले, अरुण जाधव, परीट मंडळाचे अध्यक्ष रवींद्र जाधव, सचिव विजय वाघ , परदेशी समाजाचे
अध्यक्ष चंदू भाऊ परदेशी, अविनाश जाधव, प्रा. अनिल
पवार, प्रा. अनिल वाल्हे सतिश पवार , डॉ योगेश महाले लक्ष्मण परदेशी राकेश परदेशी जगतराव निकुंभ आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध
समाजसुधारक होते.दीनदलित आणि पीडितांच्या सेवेसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य दिले. लोक प्रबोधनाचा एक भाग त्यांचे कीर्तन असायचे. सामाजिक रूढी आणि परंपरेच्या टीका त्यात असायच्या. त्यांनी समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून दिले आणि स्वच्छता आणि चारित्रयाची शिकवण दिली.”देवळात जाऊ नका, मू्तिपूजा करू नका, सावकारा कडून कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोरथी-पुराण, मंत्र-तंत्र, चमत्कार सारख्या गोष्टीवर विश्वास ठेवूनका.”ही त्यांची शिकवण होती.माणसातच दैव आहे असे त्यांचे मत होते. ह्याचाच शोथ ते घेत होते. समाज कार्यासाठी मिळालेल्या देणगीतून त्यांनी अनाथ लोकांसाठी अनाथालय, धर्मशाळा, आश्रम, विद्यालय सुरू केले.दीन-दुबळे, आअपंग-अनाथ हेच त्यांचा साठी देव होते.त्यांच्या सेवेमध्येच जास्तच जास्त काळ वेळ रमायचे.त्यांनी आपल्या कीर्तनातून सांगितले “देव दगडात नसून तो माणसांत आहे” हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. समाजातील अज्ञान,अंधश्रद्धा, भोळ्या समजुती , अनिष्ट रूढी-परंपरा दूर त्यांनी आपल्या कीर्तनातून सांगितले “देव दगडात नसून तो माणसांत आहे” हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. समाजातील अज्ञान,अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य दिले.
यावेळी रक्तदात्यांना अमळनेर युवा परिट धोबी मंडळाच्या वतीने राष्ट्रसंत गाडगेबाबांची प्रतिमा भेट देण्यात आली .सदर कार्यक्रमास गंगाराम वाल्हे, किशोर महाले , अनिल वाघ, गणेश नेरकर, भरत जावदेकर,उमेश वाल्हे अनिल मांडोळे, मधुकर निंबाळकर, दिपक सुर्यवंशी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन दिपक वाल्हे यांनी तर आभार परिट मंडळाचे कार्याध्यक्ष विनोद जाधव सर यांनी केले.