अमळनेर, दिवाळीच्या सूटया सुरु आहेत तसेच शाळांनाही सुट्या लागल्या आहेत. दिवाळीच्या सुट्या मध्ये अनेका कडून बाहेरगावी जाण्याचा बेत आखला जातो. मात्र,चोरटे बंद घराला लक्ष्य करीत असतात. यासाठी बाहेरगावी जाताना पोलिसाना माहिती देणे अनिवार्य आहे.
गेल्या काही दिवसा पासून शहरात चोरी, घरफोड़ीचे प्रमाण वाढले आहे.अनेक जण नोकरी, व्यवसाय,मुलाच्या शिक्षणासाठी मूळ गावा ऐेवजी शहरात राहतात. दिवाळीत बहुतेक जण गावाला येतात, काहीजण राज्यात, परराज्यात किवा अगदी विदेशात फिरायला जाण्याचा बेत आखतात.परंतु सुटी च्या काळात बाहेरगावी जाताना घराच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करू नका. नाही तर चोरठे तुमच्या घरात दिवाळी साजरी करतील.असे व्हायला नको यासाठी पोलिसाना माहिती द्या.सुरक्षेची काळजी घ्या.घरात कोणीही नसताना घरातील मौल्यवान वस्तू, पैशाची काळजी घेणेही आवश्यक आहे.
म्हणूनच बाहेरगावी जाताना घराला कुलूप व्यवस्थित लावले असावे. सुरक्षेसाठी आवश्यक यंत्रणा असायला हवी,असा सल्ला आम्हीं करडी नजर न्युज सह पोलिसा कडून देण्यात येत आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षकविकास देवरे……. दिवाळीच्या सुट्टया मध्ये फिरायला गेल्यानतर बरेच दिवस घर बद असते.अशाघरावर चोरटे पाळत ठेवून चोरीचा प्रयत्न करीत असतात चोरी, घरफोड़ी यासारख्या घटना घडू नयेत,यासाठी नागरिकानी बाहेरगावी जाताना शेज़ाऱ्याला कळवावे,काही अनुचितघ डल्याचे लक्षात येताच डायल ११२ किवा पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा.बाहेरगावी जाताना बंद घरात दागिने,पैसे,किमती वस्तुू घरात न ठेवता बैंक लॉकर मध्ये ठेवा.शेजार्याना माहिती द्या.३ ते ४ घरानी मिळून एखादा गुरखा नेमावा.गस्त वरील पोलिस कर्मचार्यांचा संपर्क क्रमाक घ्यावा,कॉलनी किवा परिसरात संशयित आढळल्यास पोलिसांना कळवा.अलार्म सारखी एखादी बेल बसवा, बद घराच्या परिसरातील लाइट सुरु ठेवा.
*”करडी नजर न्युज च्या सर्व वाचकांना दिपावली निमित्त मंगलमय हार्दिक शुभेच्छा”*
*प्रा डॉ विजय तुळसाबाई शालिग्राम गाढे*
मुख्य संपादक करडी नजर न्युज