अमळनेर येथील महसूल प्रशासना तर्फे गुड गव्हर्नर विक अंतर्गत दि २३ रोजी लोकशाही दिनाचे आयोजन.
सविस्तर वृत्त असे की,प्रशासकीय सुधार एवं लोक शिकायत विभाग कार्मिक लोक शिकायत और पेंशन मंत्रालय, भारत सरकार यांचे मार्फत गुड गव्हर्न्स वीक अंतर्गत प्रशासन गाव की ओर ही मोहीम दि.19 ते 24 डिसेंबर 2024 दरम्यान राबविण्यात येणार आहे. सदर मोहिमे अंतर्गत दिनांक 23 रोजी दुपारी 3.00 वाजता नगरपरिषद सभागृह,अमळनेर येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात तालुक्यातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित राहणार आहत. तक्रार असणाच्या नागरीकांनी नगरपरिषद सभागृह, अमळनेर येथे उपस्थित राहुन तक्रार सादर करण्याबाबत आवाहन तहसीलदारांनी केले आहे.