अमळनेर- विधानसभा मतदारसंघात असलेल्या पारोळा तालुक्यातील सुमारे 42 गावात भरगच्च विकास कामांमुळे मंत्री अनिल पाटील यांनाच साथ मिळणार असा दावा या भागातील राष्ट्रवादी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यानी व्यक्त केला असून बोरी नदीवर बंधाऱ्यांची मालिकाच अनिल दादांनी अवतरविल्याने शेतकरी बांधवाना जलसंजीवनी मिळाली आहे.
बंधारे, काँक्रीटीकरण, सभामंडप, ग्रामपंचायत इमारत, स्मशान भूमी, सुशोभीकरण, डांबरीकरण, समाज मंदिर, आर ओ प्लांट, पेव्हर ब्लॉक, सामाजिक सभागृह, सरक्षन भिंत यासारखी कामे मार्गी लागून गावोगावी मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. विशेष म्हणजे आदिवासी भिल वस्ती असेल, मागास वर्गीय वस्ती असेल, कींवा तांडा वस्ती असेल अनिल दादाने प्रत्येकाला न्यायचं दिला आहे,असे गावकरी चर्चा करत आहेत.