अमळनेर ,ओमकार अंध के व्ही के सोसायटी मुंबई यांच्या कडून किशोर देवरे यांनी 50 सकस आहार किट त्यांच्या स्वतःच्या खर्चातून अमळनेर येथे पार्सल द्वारे पोहचवले, व मकसुद भाई बोहरी यांच्या कडून 30 प्रोटीन किट देण्यात आले. आधार बहुउद्देशीय संस्था व रोटरी क्लब अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने एच आय व्ही सह जगणाऱ्या मुलांना व मुलींना व गरजु व्यक्ती यांना सकस आहार कीट व प्रोटीन किट चे वाटप अंकुर सेवा सेतू अंतर्गत करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मकसुद भाई बोहरी , रोटरी क्लबचे अध्यक्ष ताहा बुकवाला व रोटरी क्लब चे सिनियर मेंबर चेलाराम सैनानी व डॉ दिलीप भावसार यांची उपस्थिती होती.
यशस्वितेसाठी आधार संस्थेचे टीम मेंबर तौसिफ शेख ,दीपक विश्वेश्वर, उर्जिता शिसोदे, पुनम पाटील यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कापडे यांनी केले व या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ताहा बुकवाला यांनी केले.