अमळनेर : येथील पांझरा नदी पात्रातील वाळू वर माफियांचा डल्ला मारने सुरूच.मात्र प्रशासन या कडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे की काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गेल्या तीन चार वर्षापासून तालुक्यात वाळूचां शासकीय ठेका देण्यात आलेला नाही त्यामुळे वाळू चोरणाऱ्या माफियांचा सुळसुळाट माजला असून अवैधपणे वाळू वाहतूक केली जात आहे. सदर बाबतीत पत्रकार सह जागृत नागरिकांनी अमळनेर तहसीलदार surana यांना वारंवार तोंडी कळविले आहे.मात्र महसूल विभाग कारवाई करण्यात पाहिजे तशी हालचाल करतांना दिसत नाही.यामुळे शासनाची रॉयल्टी जमा होत नाही.एकूणच शासनाचा तोटा होत आहे.सदर ची वाळू रात्री 8 ते सकाळी 8 असा 12 तासांचा वेळ वाळू माफियानी जणू ठरवून घेतला असल्याचे समजते.पांझरा काठावरील कळंबु, बाम्हणे यांसह काही ठिकाणी ही वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांनी दिली आहे.
लाखो रुपयांचे नुकसान शासनाचे होत असल्याने या कडे स्थानिक महसूल विभागतील अधिकारी व कर्मचारी यांच्या वेतनातून सरकारने भरपाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.अधिकारांच्या संपत्तीची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेने करावी व त्यात अतिरिक्त संपत्ती आढळताच शासनाचे झालेले नुकसान म्हणून सक्तीने भरपाई करावी.जेणे करुन वाळू चोरी बाबत दुर्लक्ष होणार नाही व शासनाच्या तिजोरीत महसूल जमा होईल.