अमळनेर प्रतिनिधी, शहरातील ढेकू रोड परिसरातील सद्गुरू नगर, दीपक नगर, योगेश्वर नगर तसेच गुलमोहर कॉलनी येथुन घरासमोर लावलेल्या तब्बल चार दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
सविस्तर वृत्त असे की,शहरातील पोलिस ठाण्याकडे जाणाऱ्या ढेकु रोडा लगत असलेल्या अतिशय गजबजलेल्या कॉलनी परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने नागरिकां मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.विशेष बाब म्हणजे सध्या नवरात्र दांडिया उत्सव साजरा होत असताना या कालावधीत रात्री उशिरा पर्यंत नागरिक दांडिया उत्सवात सहभाग घेत असतात.तरीही अश्या पद्धतीचे चोऱ्या होत असल्याने पोलिस प्रशासनाने रात्रीची गस्त वाढविणे आवश्यक असल्याचे नागरिक चर्चा करीत आहेत.अशीच दुचाकी चोरीच्या घटना घडल्या आहेत.अंकित गुर्जर रा. देवास हे खाजगी नोकरी निमित्त सद्गुरू नगर,ढेकू रोड येथे राहत असून त्यांची हिरो स्प्लेंडर प्लस दुचाकी क्रमांक एमपी ४१ झेडई ८०८३ ही दिनांक ३ रोजी दुचाकी चोरीला गेल्याचे दिसून आले तर ढेकू रोड परिसरात दीपक नगर येथील हर्षल सुरेश पाटील यांची होंडा सिेबी शाईन क्र. एमएच ०५ ईई ३२१६ ही दुचाकी सुद्धा चोरीला गेली .दोन्ही चोरीला गेलेल्या दुचाकींचा अमळनेर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून हेड कॉन्स्टेबल विनोद सोनवणे हे करीत आहेत.
अशीच दुचाकी चोरीची घटना योगेश्वर कॉलनी ढेकू रोड परिसरातील रहीवाशी सुनील पाटील यांची होंडा शाईन दुचाकी क्र.एमएच १९,डीएन ०२८७ रात्री घरासमोर लावली होती. मात्र दिनांक ३ रोजी सकाळी दुचाकी चोरीला गेल्याचे समजल्याने या बाबत पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली तर अशीच चोरीची घटना गुलमोहर कॉलनीत राहणारे जितेंद्र मोरे यांची होंडा युनिकॉर्न दुचाकी क्र. एमएच १९ इबी २१४४ देखील चोरीस गेल्याने परिसरात खळबळ उडाली .सदर बाबीची अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉँ संतोष पवार हे करीतआहेत.
पोलिस निरीक्षक विकास देवरे यांचे नागरिकांना आवाहन……..
नागरिकांनीरात्रीच्या कालावधीत सतर्क रहावे.आपल्या दुचाकी साखळदंडांनी सुरक्षित ठिकाणी ठेवावे.परगावी जाण्या आधी पोलिस ठाण्यात सूचना द्यावी.घरात मौल्यवान वस्तू नठेवता बँक सारख्या सुरक्षित ठिकाणी ठेवावे.आपल्या परिसरात एखादा संशयित व्यक्ती आढळल्यास त्वरित पोलिस ठाण्यात कळवावे.