अमळनेर प्रतिनिधी, येथील जिल्हा क्रीडा संचालनाय विभाग जळगाव व अमळनेर क्रीडा संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने अथलेटिक्स खेळाचे आयोजन अमळनेर येथे करण्यात आले होते. पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे वयोगट 14 व 17 मुलांच्या ॲथलेटिक्स खेळ प्रकारात तालुकास्तरीय स्पर्धेत विजेते ठरले असून त्यांची निवड
जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली असून त्याचे क्रीडा प्रेमीकडून तसेच सर्व स्तरावून त्यांचे अभिनंदन व गोड कौतुक होत आहे. वयोगट वर्ष 14 मध्ये लांब उडी या प्रकारात नैतिक प्रदीप चौधरी याने तालुक्यातून दुसरा दुसरा येण्याचा बहुमान प्राप्त केला. तसेच दुसऱ्या क्रीडा प्रकार विभागात म्हणजेच धावणे 200 मीटर या प्रकारात वर्ष वयोगट सतरा मध्ये वैभव पाटील याने द्वितीय क्रमांक प्राप्त करून त्याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अतिशय उत्तम व प्रशिक्षक याचे त्याचे मार्गदर्शन आत्मसात करून त्यावर कृतीयुक्त अंमलबजावणी करून उपरोक्त यश संपादन केले.
सदर विद्यार्थ्यांना तंत्रशुद्ध प्रशिक्षण क्रीडा शिक्षक विनायक सूर्यवंशी, महेश माळी व रोहन मुंदडा यांचे मार्गदर्शन लाभले. सदर खेळासाठी मार्गदर्शन सहकार्य शाळेचे चेअरमन श्री प्रदीप जी के अग्रवाल मुख्याध्यापक श्री. जे. एस. देवरे सर, पर्यवेक्षक महेश माळी सर पर्यवेक्षिका एम. एस. बारी मॅडम, प्रशांत वंजारी, करिष्मा जैन, सौ. राजश्री पाटील समस्त शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.