● रुसा व ईंग्रजी विभागाचा संयुक्त
उपक्रम
● स्पर्धा परीक्षेसाठी ईंग्रजी विषय
महत्वाचा
● डॉ.वैभव सबनीस यांचे विशेष
व्याख्यान
———————————————
अमळनेर प्रतिनिधी, येथील खान्देश शिक्षण मंडळाचे प्रताप कॉलेज (स्वायत्त), अमळनेर आणि राष्ट्रीय उच्चतर शिक्षण अभियान (RUSA) यांच्या संयुक्त विद्यमाने ०९ ऑक्टोबर २०२४ रोजी “स्पर्धा परीक्षांमध्ये इंग्रजीचे महत्त्व” या महत्वपूर्ण विषयावर एक विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले.या शैक्षणिक उपक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.व्ही. एस.तुंटे होते, तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा.डॉ.वैभव सबनीस यांनी विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.
व्याख्यानाचे अध्यक्षस्थान आणि प्रमुख वक्ते डॉ.वैभव सबनीस यांनी इंग्रजी विषयाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकत, व्याकरण, शब्दसंग्रह, वाचन, आकलन, आणि लेखन कौशल्य यांचा स्पर्धा परीक्षांमध्ये कसा वापर होतो,हे स्पष्ट केले. त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये वेळेचे नियोजन कसे करावे तसेच उत्तरे लिहिताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याविषयीही मोलाचे मार्गदर्शन दिले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष मार्गदर्शन इंग्रजी विभागप्रमुख डॉ.धीरज आर. वैष्णव आणि महाविद्यालयाचे आदरणिय प्राचार्य डॉ.अरुण बी.जैन, रुसा समन्वयक डॉ.मुकेश भोळे,कुलसचिव राकेश निळे यांनी सहकार्य केले.
प्रस्तुत व्याख्यानांमुळे विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या ज्ञानाचा योग्य उपयोग कसा करावा याबद्दल वक्त्यांनी मूलभूत स्वरूपाचे मार्गदर्शन केले.या प्रसंगी विभागातील डॉ.जितेंद्र पाटील,डॉ.निलेश चित्ते,डॉ.हेमंत पवार आदी कार्यक्रम यशस्वी करण्यात सक्रिय होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. डॉ.जितेंद्र बी.पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. डॉ. एच. जी. पवार यांनी आभार प्रदर्शन करत सर्व मान्यवरांचे आणि उपस्थितांचे आभार मानले.
प्रस्तुत व्याख्यानाच्या आयोजनात
प्रा.नितीन पाटील आणि प्रा. डॉ. निलेश चित्ते यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच प्रा.भोजराज पाटील, प्रा.दिपक कोकणी, प्रा.रागिणी सैंदाणे, प्रा.अमृता नेतकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सदरच्या विशेष व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये इंग्रजीचा अभ्यास कसा करावा याची सखोल माहिती मिळाली. उपस्थित विद्यार्थ्यांनी व्याख्यानाचा फायदा घेतला असून त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. व्याख्यानानंतर झालेल्या प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी डॉ.सबनीस यांच्यासोबत संवाद साधला आणि आपल्या शंकांचे निरसन केले.
प्रताप कॉलेजने या विशेष व्याख्यानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांवर सखोल मार्गदर्शन करून त्यांना नवीन दिशा दिली आहे.