इतिहासात अनेक राजे , प्रधान अथवा सरदारांच्या दल बदलू धोरणाने राजकीय विरासती नष्ट अथवा प्रसार पावलेल्या बघायला मिळतात. स्वार्था साठी विरोधी राजाला जाऊन मिळणे व आपल्या पदरात बक्षीस स्वरूपात जाहगिरदारी मिळविल्याचे अनेक उदाहरण मिळते.मात्र या वृती मुळे रयतेचा फायदा कमी पण स्वतःचा फायदा झालेला दिसून येतो.
अगदी तशीच स्थिती भारतातील राजकारणात गेल्या काही काळात दिसून येत आहे.स्वार्था साठी स्वपक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाण्याचे सत्र जोरात सुरू असल्याचे दिसून येत आहे.यात ही नागरिकांचे हित साधलेले दिसत नसल्याचे सुज्ञ नागरिक बोलत आहेत.पद व आर्थिक स्वार्थ साधण्यात नेते मंडळी मग्न असल्याने नागरी विकास साधणे अशक्य असल्याचे मत नागरिक करडी नजर कडे व्यक्त करीत आहे.
अमळनेर तालुक्यातील राजकीय घडामोडी पाहता विकासाचे गाजर दाखवत स्वार्था साठी पक्ष बदल करतांना बघायला मिळते.या मुळे अमळनेर तालुक्यातील अनेक प्रश्न आहे त्याच स्थितीत आहेत.त्यात तसूभर ही बदल झालेला नाही. पाडळसरे धरण हे त्याचे ज्वलंत उदाहरण होय.गेल्या अनेक वर्षंपासून या मुद्यावर निवडणुका लढण्यात आल्या. धरणा बाबत तज्ञ लोकांच्या मते केंद्र सरकारने आज मनावर घेतल्यास अजून सात ते आठ वर्षाच्या कालावधी नंतर धरण पूर्णत्वास जाईल.धरणासाठी पक्ष बदल करण्याच्या वल्गना राजकीय नेते करीत जरी असले तरी हे फक्त खोटे आश्वासन असल्याची चर्चा नागरिक करीत आहे.तसेच शहर सह गाव खेड्यातील अनेक समस्या आवासून आहेत.रस्ते सह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.दुष्काळ पडून ही राजकीय नेत्यांचा शेतकऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन योग्य नसल्याने शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहे तरीही पाहिजे तशी मदत मिळत नसल्याने त्यांच्या कुटुंब उद्ध्वस्त होत आहे.तालुक्यात पाहिजे तशी उद्योग धंदे नसल्याने बेरोजगारी वाढली व पर्यायाने गुन्हेगारी सुद्धा वाढल्याचे शासकीय आकडे बोंब मारत आहे.महिलां सह तरुण मुली सुरक्षित नसल्याचे चित्र अलीकडे बघायला मिळते.या सर्वांच्या बाबतीत तालुक्यातील राजकीय,सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवरांचे मत करडी नजर ने जाणून घेतले असून या माध्यमातून वास्तविक स्थिती सरकार पर्यंत पोहचविण्यासाठी प्रसारित करीत आहोत कारण या गोष्टींचा परिणाम हा देशातील लोकशाही वर होत आहे.
राजकीय पुढा-याचे गट बदलू धोरण लोकशाहीस मारक
————————————————-आजच्या उत्तर आधुनिक युगात नैतिक मूल्याचा -हास होत आहे.विशेषतः राजकारणात एकनिष्ठता,त्याग व समर्पण हे अलिकडे हद्दपार होत आहे त्यामुळे लोकशाहीचे पाळेमुळे अधिक भक्कम होण्यास अडथळे निर्माण होत आहेत.म्हणून कोणत्याही राजकीय पुढा-याची तत्व निष्ठता हेच एक विचार(Ideology) आहे,या कडे दुर्लक्ष होताना निदर्शनास येते. घुम जाव अथवा गट बदल धोरण यामुळे एका प्रकारे विश्वासअहर्ता गमावण्याची भीती उत्पन्न झाली आहे म्हणून निरोगी समाज व राजकारणासाठी बळकट तत्वाची आवश्यकता आहे.
डॉ.विजय तुंटे
प्राध्यापक,राज्यशास्त्र विभाग
प्रताप कॉलेज(स्वायत्त),अमळनेर
–
-अमळनेर तालुक्यातील पुढाच्यांची भूमिका समाजास तारक की मारक ? या विषयाबाबत स्वमत – राजकीय क्षेत्रात वावरणाया पदाधिकार्यांचे समाजहित, सामाजिक नैतिकता, सामाजिक नीतिमत्ता या वृत्तीशी दूर-दूर पर्यंत संबंध दिसून येत नाही . स्वः हिताला समाज हिताचा मुलामा देऊन समाजाला भुलबणे, फसवणे अशी समाजघातकी , समाजद्रोही , समाजमारक भूमिका कशी समाज हिताची आहे ? ही बाब आपल्या बगलबच्च्यां मार्फत समाजात रुजविण्यासाठी केविलवाणी , निंदनीय व लांचछनास्पद अशी धडपड अमळनेर तालुक्यातील राजकीय क्षेत्रात वावरणा्या पुढाच्यांची सुरू आहे . दुर्दैवाने समाज देखील अशा वृत्तीच्या दडपणाखाली मजबुरीने
व हतबलतेने वावरतांना दिसून येत आहे.
सत्यशोधक विश्वासराव पाटील, अध्यक्ष – गावरानी जागल्या सेना.
–
राजकीय नेत्यांनी पक्ष किंवा दल बदलणे म्हणजे मतदार ,कार्यकर्ते आणि समर्थकांचा विश्वास गमावणे होय. आणि दल बदलल्यानंतर पुन्हा समर्थकांची गर्दी ,स्तुतिपाठक निर्माण करण्यासाठी लाच , आमिष , भ्रष्टाचार ,लालच असे मार्ग फुटतात त्यातून सर्वसामान्य जनतेचे नुकसानच होते. विकासावर परिणाम होऊन बोजा नागरिकांवर पडतो. पक्ष ,संघटन ,विचार आणि तत्वे खिळखिळे व्हायला लागली असल्याने भविष्यात देशाच्या असुरक्षितत्तेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.-
संजय पाटील, जेष्ठ पत्रकार ,अमळनेर व्यवसाय -शिक्षक
–
दलबदलू नेत्यांना नेमकं विकासाचं धोरण राबविण्याची क्षमताच शिल्लक उरत नाही.ते आपल्या नेत्यांच्या गुणगौरवात स्वतःसोबत जनतेलाही गुंढाळतात. सर्वसामान्य जनता वा बुद्धिवादी लोक जेव्हा देश, मूल्ये, तत्व् याऐवजी नेत्याला शरण जातात तेव्हा अश्या स्थितीत वरपासून खालपर्यन्त आळशी आणि बिघडलेल्या लोकांमध्ये आम्ही सुद्धा सामील झालोत कि काय अशी शंका येते. नेते आजच बघताहेत, विचार वगैरे गेले खडुयात या वृत्तीने अमळनेरातील राजकारणी सुद्धा काही हेकेखोरांच्या दावणीला बांधलेली दिसतात. त्यामुळे हे दलबदलू स्वतःचं सुरळीत करतील मात्र जनतेला टूर ढकलतील.त्यामुळे हि दलबदलू प्रवृत्ती मारकच आहे.
गौतम मोरे, राजकीय विश्लेषक,अमळनेर
–
राजकीय पुढाऱ्यांचे अमळनेर मधील दलबदलू धोरण हे आपल्या शहरासाठी घातक असून याचा निश्चित च जनमाणसावर विपरीत परिणाम दिसून येत असून हा सगळा खोक्यांचा च परिणाम असल्यामुळे आम जनता नाराज असून कर्मचारी वर्गाची देखील हीच भावना आहे.
सोमचंद संदानशिव, अमळनेर न पा कामगार नेते
–
अमळनेर तालुक्यात राजकीय पुढा-यांना गावांशी प्रभागशी काही घेने देणे नाही.स्वता च्या स्वार्थासाठी समाजाचे ,गावाचे, प्रभागाचे व आहेत त्या पक्षाचे नेतृत्व करतांना आपल्या सर्व सामान्य लोकांच्या भावनेशी खेळतात व पटेल तेव्हा दलबदलुपणा स्वताचे हितासाठी स्वार्थासाठी करतांना दिसतात म्हणुन असे बेडका प्रमाणे कधीही ईकडे तिकडे उड्या मारणाऱ्या पुढा-यांना लोकांनी येणा-या काळात धडा शिकवायला हवा व तरुणांनी ही यांच्यापासून सावध असायला पाहिजे.
किरण बहारे, सामाजिक कार्यकर्ते