अमळनेरात विधानसभा निवडणूक प्रशिक्षणास १६६६ कर्मचारी हजर तर ४९ अनुपस्थित……अनुपस्थित कर्मचाऱ्यांना एक संधी देणार – नितीन मुंडावरे

अमळनेर प्रतिनिधी येथील विधानसभेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी नितीन मुंडावरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील ग्लोबल स्कूल मध्ये १६६६ कर्मचाऱ्यांनी घेतले प्रशिक्षण.

सदर प्रशिक्षण प्रांताधिकारी नितीन मुंडावरे , तहसीलदार रुपेशकुमार सुराणा , तालुका कृषी अधिकारी सी जे ठाकरे , गटविकास अधिकारी रामावत,उपविभागीय अभियंता हेमंत महाजन , भागवत माळी , डी ए धनगर यांच्यासह ४४ अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण दिले. सकाळी ९ ते १ व दुपारी २ ते ६ दरम्यान दोन टप्प्यात प्रशिक्षण देण्यात आले. एकूण २२ खोल्यांमध्ये कर्मचार्यांच्या प्रशिक्षणासाठी व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक वर्गात स्वतंत्र बैठक , स्वतंत्र एलईडी पडदा अशी व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक वर्गात दोन सेक्टर अधिकारी व तज्ञानी प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणासाठी ३९१ मतदान केंद्र अध्यक्ष, ३९७ प्रथम मतदान अधिकारी , तसेच ८७८ इतर मतदान अधिकारी असे एकूण १६६६ कर्मचारी हजर होते.

अनुपस्थित कर्मचारी यांना एकदा संधी देणार आहोत मात्र पुन्हा अनुपस्थित राहिल्यास कारवाई करण्यात येईल असे नितीन मुंडावरे ,उपविभागीय अधिकारी यांनी यावेळी सांगितले.

१२ मतदान केंद्राअध्यक्ष , ४ प्रथम मतदान अधिकारी , ३३ इतर अधिकारी असे एकूण ४९ कर्मचारी अनुपस्थित होते.

प्रशिक्षण सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशांत धमके,नितीन ढोकने,संदीप पाटील,भूषण पाटील,प्रियंका पाटील,रुपाली अडकमोल,एम पी भावसार यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!