अमळनेर प्रतिनिधी,राजकारण हे एक असे क्षेत्र आहे, जिथे विश्वास, समर्थन आणि संपर्क यांचा अभाव कधीच सहन होत नाही. आता, अमळनेर विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने एक नवा नायक पुढे आणला आहे – डॉ अनिल नथ्थू शिंदे. त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भक्कम समर्थन दिल्याने त्यांच्या विजयाची चर्चा जोरात सुरू आहे. विशेष म्हणजे, माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी श्री गजानन महाराज यांची शपथ घेऊन सांगितले की डॉ शिंदे यांनाच निवडून आणणार. यामुळे डॉ अनिल शिंदे यांचे स्वप्न साकार होण्याची शक्यता आता अधिक गडद झाली आहे.
माजी आमदार साहेबराव पाटील विधानसभेमध्ये उभे राहणार होते पण नंतर आमदारकी लढवण्याची इच्छा अचानक त्यांनी माघार का घेतली.. असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आजही आहेत.. माजी आमदार कृषी भूषण साहेबराव पाटील महाविकास आघाडीला साथ देतील का? असे अनेक प्रश्न आहेत. सध्या त्यांनी डॉक्टर अनिल शिंदे यांना साथ देण्याचे निश्चय केला असल्याने डॉक्टर शिंदे यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे…