गावखेड्यातील लाडक्या बहिणींनी भाऊबीजीला अनिल शिंदे यांना ओवाळून विजयीभवचा दिला आशिर्वाद…प्रचार दौऱ्यात तरुण मतदारांची मिळत आहे साथ

अमळनेर येथील विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल नथ्थु शिंदे यांनी महाविकास आघाडीचे सर्व नेते,पदाधिकारी, ज्येष्ठ नेते तसेच युवा कार्यकर्ते समर्थकां सोबत देवगाव, देवळी, नगाव बु, नगाव खु, गडखांब,कचरे,धुपी,माजडीॅ या गावामध्ये अत्यंत प्रभावी प्रचार दौरा काढला. या दौऱ्यामध्ये ठिक ठिकाणी लाडक्या बहिणींनी भाऊबीजी निमित्ताने डॉ अनिल शिंदे यांचे औकक्षण करून त्यांना विजयीभवचे दिले आशिर्वाद. तर ग्रामस्थांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर, बेरोजगारीच्या मुद्द्यांवर आणि हमीभावाच्या अभावाबद्दल खुलासा केला.

डॉ. शिंदे यांच्या नेतृत्वात, कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या दयनीय परिस्थितीवर, बेरोजगारीच्या प्रश्नांवर चर्चा केली. या संदर्भात, त्यांनी मतदारांना आवाहन केले की, “चांगल्या मतांनी मला निवडून द्या आणि सेवेची संधी द्या.” हे शब्द जनतेचा उत्साह वाढवण्यात महत्त्वपूर्ण ठरले.

*परिवर्तनाचा संदेश……*

“जनता बोले परिवर्तन!” हे वाक्य आता अमळनेर विधानसभा मतदारसंघात एक महत्त्वाचे सूचक ठरले आहे. डॉ.अनिल शिंदे यांच्या नेतृत्वात, सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करणे सुरू केले आहे. मतदारांनी स्पष्टपणे व्यक्त केले की, या मतदारसंघातील परिवर्तन निश्चित आहे. त्यांनी सांगितले, “हाथ बदलेगा हालात,” म्हणजेच लोकशाहीच्या माध्यमातून बदल साधला जाईल.

महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या दृष्टीने जोमाने कामाला लागले आहेत. डॉ. शिंदे यांच्या उमेदवारीसाठी मतदारांमध्ये उत्साहाची लाट दिसून येत आहे.अमळनेर विधानसभा मतदारसंघात डॉ. अनिल शिंदे यांच्या प्रचार दौऱ्यात शेतकऱ्यांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित केले गेले आणि मतदारांचे समर्थन मिळविण्यासाठी प्रयत्न केले गेले. त्यांच्या स्पष्ट वचनांमुळे, जनता त्यांना विश्वासाने स्वीकारत आहे. महाविकास आघाडीच्या या यशस्वी प्रचारामुळे, अमळनेर विधानसभा निवडणुक महत्त्वपूर्ण ठरेल. त्यामुळे अमळनेर मध्ये सकारात्मक बदल घडवण्याची आशा कुणीही नाकारू शकत नाही.
आशा आहे की, डॉ. अनिल शिंदे यांचा आवाज सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचेल आणि महाराष्ट्राच्या भविष्यकाळात एक नवा प्रकाश आणेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!