अमळनेर येथील वंचीत बहुजन आघाडीच्या तर्फे तालुक्यातील उच्च शिक्षित तथा प्रसिद्ध शल्यचिकित्सक व आघाडीचे उमेदवार डॉ अनिल शिंदे यांना जातीयवादी पक्षाला व लोकशाही वाचवण्याच्या दृष्टीने जाहीर पाठींबा देण्यात आला.
सविस्तर वृत्त असे की, राज्यात युती सरकार हे जातीयवादी सरकार असल्याने त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी अमळनेर विधानसभेत युतीचे उमेदवार अनिल पाटील यांना सत्तेत नपाठविण्याचा चंग दलित वंचीत समाज सज्ज झाला आहे. लोकशाही वाचवण्यासाठी व देशाचे संविधानाचे रक्षण व्हावे या करीता राज्यात फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचे सरकार यावे म्हणून अमळनेर विधानसभेत आघाडी चे उमेदवार डॉ अनिल शिंदे यांना अमळनेर वंचीत बहुजन आघाडी तर्फे पाठींबाचे पत्र देऊन जाहीर समर्थन देण्यात आले आहे.
सदर पाठींबा पत्रात वदेशातील लोकशाही विरोधी धोरण राबविणाऱ्या युती सरकारला अवरोध निर्माण करण्याचा प्रांजळ हेतू ठेवून डॉ अनिल शिंदे आघाडी तर्फे अमळनेर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवारी करीत आहेत.आमच्या बहुजन वंचित आघाडीचां मुख्य उद्देश हा लोकशाही वाचविण्यासाठी लढा देणे व लोकशाही वाचविण्यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या पक्षाच्या पाठीशी शुद्ध हेतूने उभे राहणे हे आमचे आम्ही कर्तव्य समजतो.याच कारणास्तव महाराष्ट्रातील जातीयवादी शक्तींना सत्ते पासून दूर ठेवण्यासाठी तालुका स्तरावर वंचित आघाडी तर्फे जाहीर पाठींबा देत आहोत.त्याबदल्यात लोकशाही जिंवत ठेवण्यासाठी आपण अथक प्रयत्न कराल हा आमचा विश्वास कायम करावे,ही अपेक्षा पाठींबा पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.
तालुका अध्यक्ष दाजीबा गव्हाणे,उपाध्यक्ष मोहन बैसाणे,पंकज वानखेडे, पुनमचंद निकम,सचिव भीमराव वानखेडे, संघटक अरुण पाटील,किशोर मैलागीर,आशिष बाविस्कर,संदिप वानखेडे, श्रीकांत वानखेडे, जितेंद्र गव्हाणे, साहेबराव सांळूखे, समाधान शिरसाट, साधू भिल,महेंद्र बैसाणे,ग्यानदास बाबा,आदित्य भामरे,निखिल निकम,आवेश पठाण,रोहन कोळी,गणेश निकम व आदित्य सोनवणे आदी कार्यकर्ते यांनी डॉ अनिल शिंदे यांना पुष्पहार घालून जाहीर पाठींबा पत्र प्रदान केले.
यावेळी डॉ अनिल शिंदे यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी आदिवासी नेते पन्नालाल मावळे, काँग्रेस चे ज्येष्ठ नेते धनगरदला पाटील, निळकंठ पाटील उपस्थित होते.