अमळनेर प्रतिनिधी,महाविकास आघाडीचे आज दिनांक ६ नोव्हेंबर 2024 रोजी संध्याकाळी चार वाजता अंबिका मंगल कार्यालय,गलवाडे रोड येथे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे.
सदर प्रशिक्षण शिबिरात महाविकास आघाडीचे प्रमुख नेते, पदाधिकारी, बुथ प्रमुख यांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याने महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार देवदूत डॉ अनिल नथ्थू शिंदे यांनी केले आहे.