अमळनेर सारख्या पुण्यनगरीला लागलेल्या जंत रुपी किड्यांना मतदानातून ठेचा – माजी आमदार शिरीष चौधरी

 

अमळनेर येथील हि संत आणि महंतांची भूमी आहे. या अमळनेरनगरीत सामाजिक सलोखा बिघडवण्याचे पाप हा जंत करीत आहे. तेही केवळ राजकीय फायद्यासाठी, हे अत्यंत दुर्दैवी आणि चिंताजनक आहे. पाहूण घेण्याची भाषा करणे हे या पुण्यनगरीला काळीमा फासणारे आहे. निवडणुकीत ऐनतेन प्रकारे विजय मिळवण्यासाठी लोकांच्या भावना भडकावणे, जातीयवाद निर्माण करणे हे या जंताचे षडयंत्र आहे. हा प्रकार पुण्यनगरी अमळनेरला शोभणारा नसून सुज्ञ आणि जाणकार मतदारांनी या जंताच्या मतदानातून मुसक्या आवळण्याची आवश्यकता असल्याचे मत माजी आमदार शिरीष चौधरी यांनी व्यक्त केले.

पुढे ते म्हणाले की,साधू संतांची, थोर पुरूषांची, विचारवंत व समाजसुधारकांची ही भूमी आहे.शिव शाहु फुले आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे अमळनेरकर अशी ओळख आहे. पण निवडणुका येताच आपल्या राजकीय फायद्यासाठी जातीजातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न जाणिवपूर्वक केला जात आहे. विधानसभा निवडणुक सुरू असून आपल्या राजकीय फायद्यासाठी सत्ताधारी पक्षातील अनिल पाटील हे प्रक्षोभक वक्तव्ये करून अत्यंत घातक व अमळनेरच्या प्रतिमेला कलंक लावणारे काम करीत आहेत. अमळनेर शहर व मतदारसंघात जातीय सलोखा व शांतता रहावी यासाठी अशा अपप्रवृत्तींना पायबंद घालण्याची जबाबदारी आपली आहे. राजकीय फायद्यासाठी कोणी जातीच्या नावाखाली वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असेल तर ते कदापी खपवून घेऊ नका. राजकारण बाजूला ठेवून अमळनेरच्या हितासाठी या अपप्रवृत्तीना ठेचून काढा, असे आवाहन माजी आमदार शिरीष चौधरी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!