मातीतल्या माणसासाठी राजपूत समाज एकवटला आणि अनिल पाटलांना विजयी करण्याचा केला निर्धार

 

अमळनेर येथील महायुतीचे उमेदवार अनिल भाईदास पाटील यांना मातीतला भूमिपुत्र म्हणुन पाठबळ देण्यासाठी अनेक जण संघटितपणे पुढे येत असताना अमळनेर तालुका व मतदारसंघातील राजपुत समाजाने देखील अमळनेर येथे एकत्रित येत अनिल पाटलांनाच विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

राजपूत समाजाने आयोजित केलेल्या या मेळाव्यात जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला खासदार म्हणून स्मिताताई वाघ यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी मंत्री अनिल पाटील यांनाही विशेष आमंत्रित करण्यात आले होते. सर्व प्रथम छत्रपती शिवराय आणि हिंदू सूर्य वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.यावेळी खा.स्मिताताई वाघ मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की राजपुत समाजाने नेहमीच हिंदुत्व म्हणून भाजपाला साथ दिली असून लोकसभा निवडणुकीत देखील प्रत्येक गावातुन मला भरभरून साथ देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट केले आहेत.आतही आपले महायुतीचे उमेदवार अनिल पाटील असल्याने समाजाने अनिल पाटील यांनाच साथ द्यावी, त्यांनी मतदारसंघात उल्लेखनीय विकास खरोखरच करून दाखविला असून विशेष करून धरणासाठी यशस्वी पाठपुरावा केल्याने गती मिळाली आहे,लवकरच हे धरण केंद्राच्या योजनेत समाविष्ठ होऊन पूर्णत्वानतंर शेतकरी राजा सक्षम होण्याचे दिवस दूर नाहीत, अनिल दादाने खूप केलं आणि पुढेही करायचे असल्याने त्यांच्यावर विश्वास ठेवा,आपल्या मातीतल्या सुपुत्रालाच निवडून द्या, शेवटीआपल्या लोकांची काळजी आपणच घेऊ, सर्व सोवत येत असल्याने 23 चा निकाल आपल्याच पारड्यात पडेल असा विश्वास व्यक्त करत हा समाज महायुती सोबतच राहावा यासाठी राणाजींनी जसा एक एक माणूस जोडला तसाच आताही जोडा असे आवाहन त्यांनी शेवटी केले.

मंत्री अनिल पाटील बोलताना म्हणाले की मराठा व राजपुत समाज दोन्ही क्षत्रिय असल्याने लढणे आणि जिंकणे ही शिकवण आपल्याला पूर्वजांनी दिली आहे,राजकारण आणि समाजकारण करताना आम्ही जात किंवा धर्म पहिला नाही,जातीच राजकारण करत समाजाला बदनाम करण्याचं काम 2014 पासून या मतदारसंघात सुरू झालं आणि 2014 च्या निवडणूक मध्ये हा मतदारसंघ बदनाम झाला,मात्र मागील 2019 च्या निवडणूक मध्ये चूक सुधारविल्याने बदल झाला आणि मंत्रिपद आपल्या मतदारसंघाला मिळाल आणि आताही मंत्र्यालाच मतदान करण्याची संधी आपल्याला असुन,सर्व मिळून महायुती चे सरकार आपल्याला आणायचे आहे, मी गेल्या पाच वर्षात विकास कामे देताना कोणत्या गावावर अन्याय केला नाही,खऱ्या अर्थाने विकसाचे पर्व आज सुरू झाले आहे, मातीतल्या माणसाला मी कधी कुणाला फसवले नाही, नोकरी लावून देतो म्हणून पैसे गोळा केले नाही, अनेक गरजू आणि गोरगरिबांना मदतही देत असतो, मातीतला असल्यास धावुन जातो, आपल्याला शेतकरी बांधवांच्या कल्याणासाठी धरण पूर्ण करायचे असेल आणि पुढच्या पिढ्या सुखी पहायच्या असतील तर मतदान करताना नक्कीच विचार करावा आणि आपण एकाच मातीत जन्मलो असल्याने मातीसाठी खूप काही करू अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी मंचावर राष्ट्रवादी चे जिल्हा प्रवक्ते योगेश देसले,माजी जि.प.सदस्य संदीप पाटील तसेच लोटनसिंग राजपुत, भरतसिंग पाटील, मच्छीन्द्रसिंग पाटील, पुनमचंद पाटील, प्रविण सिंग पाटील, प्रकाश भीमसिंग पाटील,

अरुण पाटील, अमोल राजपूत, चांदुसिंग परदेशी,महेंद्र राजपूत, रामकृष्ण पाटील,गोविंदसिंग भिलालीकर,महेंद्र राजपुत, प्रकाश राजपुत, गुलाबसींग पाटील, प्रदीपसिंग राजपूत, विजयसिंग राजपुत, प्रविण पाटील यासह मान्यवर उपस्थित होते.

सदर मेळाव्यात कलमसरे, भोरटेक, दोधवत, कळंबु, जैतपिर, भिलाली, झाडी, शहापूर, तांदळी खेडी,आटाळे,खडके,दरेंगाव,हिंगोने,चांदणी कुर्हे, कुर्हे बुद्रुक, रामेश्वर, राजवड, खोकरोपाठ, जुनोने, खेडीढोक, लोणे, वंजारी, बोदर्डे यासह अमळनेर शहरातील शेकडो राजपुत समाज बांधव उपस्थित होते. सूत्रसंचालन ऍड दीपेनसिंग परमार यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!