अमळनेर प्रतिनिधी,येथील विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट माजी आमदार शिरीषदादा चौधरी हे उद्या दिनांक २८ ऑक्टोबर रोजी संत सखाराम महाराज यांचे दर्शन घेऊन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार.
आपल्या हक्काचा माणूस, आपला सुख दुखात सहभागी होणारा, लहान असो वा मोठा, गरीब असो वा श्रीमंत,आपल्या हसतमुख चेहऱ्याने नम्रपणे सर्वांचा आदर करणारा,आपल्या कार्यातून अमळनेर मतदार संघाचे वैभव वाढविणारा,ज्यांना जनतेने दमदार कार्यसम्राट अशी पदवी दिली असून सर्वसामान्य जनतेच्या मनातील विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांचे लाडके ज्यांची ख्याती आहे असे मा.आ.शिरीष चौधरी या निवडणुकीत अपक्ष लढणार असून मतदारसंघातील जनतेने जास्तीतजास्त मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपकृत करावे, अशी आग्रही विनंती चौधरी परिवार व शिरीष दादा मित्र परिवार कडून करण्यात आली आहे.
याप्रसंगी मतदारसंघातील मायबाप जनतेने आशिर्वाद देण्याकरिता मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिरीष दादा मित्र परिवार चे उपाध्यक्ष श्री गुलाब पाटील,हिरा उद्योग समुहाचे चेअरमन डॉ. रवींद्र चौधरी यांनी तसेच परिवार व कार्यकर्त्यांनी केले आहे.
सदरची रॅली दि.२८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता संत सखाराम महाराज वाडी संस्थान येथून भव्य रॅलीला सुरुवात होणार आहे. वाडी चौकातून निघालेल्या रॅलीची सांगता प्रांताधिकारी कार्यालय परिसरात होणार असून उपविभागीय अधिकारी कार्यालयात मा. आ. शिरीष चौधरी त्यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.