अमळनेर प्रतिनिधी, येथील मुदतीत तसेच अर्जात कोणतीही चूक नसताना ओरियनंटल विमा कंपनीने अमळनेर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांचा अर्ज नाकारले आहे, अर्ज रिजेक्ट झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कृषी विभागांशी संपर्क साधून निवेदन दिले आहे.
तालुक्यातील सगतकऱ्यांना पिकविमा अर्ज नाकारण्यात आल्याचा संदेश मोबाईलवर प्राप्त झाला. पिकविमा नाकारण्यात आलेले शेतकरी बांधव ऑनलाइन केंद्रावर चौकशीसाठी गेले असता, त्यांनी अर्जात कोणतीही चूक नसतांना व तसे स्पष्टीकरण न देता अर्ज नाकारण्यात आले असल्याचे सांगितले. ऑनलाईन अर्जात काही कागदपत्रांची अपूर्णता असेल तर अर्ज रिजेक्ट न करता अपूर्ण असलेल्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी रेव्हर्ट मध्ये यायला पाहिजे होते. पण कंपनीने सदर अर्ज रिजेक्ट केल्यामुळे ओल्या दुष्काळ सदृश परिस्थितीत अमळनेर तालुक्यातील शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.