गावराणी जागल्याच्या मागणी नुसार खरीप हंगामातील पिकांची होणार खरेदी…
अमळनेर येथील गावराणी जागल्या या शेतकरी हितासाठी सातत्याने लढणाऱ्या संघटनेच्या माध्यमातून सन 2024-25 या आथिक वर्षीच्या खरीप हंगामात शेतक-यांनी उत्पादीत केलेल्या कापूस, मका, ज्वारी, सोयाबीन, तूर या शेतमालाचे किमान आधारभूत दरांन्वयेचे शेतमाल मोजणी खरेदी कैंद्र दिनांक 15 डिसेंबर 2024 पासून नियमित व अखंडीतपणे कार्यान्वित (सुरु) करावे म्हणून अमळनेर प्रांताधिकारी नितीन मुंडेवार यांना मागणी केली होती.
त्या मागणी अर्जात शेतक-यांना वेळीच न्याय नदिल्यास शेतक-यांच्या झालेल्या आर्थिक नुकसानीची रक्कम शेतमाल विक्री दिनांक पासून 16 % (सोळा टक्के) व्याजासकट शेतक-यांना अदा करणेच्या कार्यवाहीची पूर्ता करावी,या आशयाचे अर्ज मागणी केली असता प्रांताधिकारी मुंडेवार यांनी याबाबत त्वरित कारवाई व्हावी म्हणून मा जिल्हाधिकारी, जळगांव यांना कळविले असल्याने लवकरच खरेदी केंद्र सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे कळत.