अमळनेर प्रतिनिधी, येथील यावर्षी झालेल्या पावसामुळे शेती पीक संकटात सापडले आहे.अनेक पिकांवर रोगराई पसरली आहे.त्यातच कापूस पीक शेतकऱ्यांच्या हातातुन निसटुन जाते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली असताना कृषी विभाग बघायची भूमिका पार पाडत आहे.बोगस बियाणे मुळे पिकांचे उत्पादन घटलेले असताना कृषी अधिकारी यावर कोणतीच कारवाई करताना दिसत नाही.
तालुक्यातील शेतकऱ्यांवर आलेले संकट दूर व्हावे,त्यांना न्याय मिळवा म्हणून किसान काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष प्रा.सुभाष पाटील यांनी प्रत्यक्ष शेत बांधावर जाऊन पाहणी केली.शेतमालाचे झालेले नुकसान भरपाई मिळावी म्हणून सरकार दरबारी मागणी केली. तालुक्यातील काही भागातील शेतकऱ्यांचे कपाशीच्या उत्पन्नाचे नुकसान झाल्यामुळे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून कृषी अधिकारी व बियाणे कंपनी सोबत चर्चा करून तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून आग्रह धरला. कलाली, दोधवद, हिंगोणे , निंभोरा गावातील शेतकऱ्यांनी टाटा ईशा कंपनीचे कापुस वान लावले असता कापसाचे पीक चार महिन्यांचे झाले तरी त्या शेतात एकही कैरी नाही,फुल पाती नाही, फुगळी नाही शेतकऱ्यांनी कंपनी प्रतिनिधीला वेळोवेळी कल्पना दिली.मात्र सदर कंपनीने याउलट शेतकऱ्यांना फवारणी व खत देण्याचा सल्ला दिला,शेंडा खोडंल तरी काहीही फायदा नाही.यामुळे संतप्त शेतकरी व किसान काँग्रेस जिल्हा अध्यक्ष प्रा सुभाष पाटील यांनी कृषी सहाय्यक,पंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी ,कंपनी प्रतिनिधी यांना संपर्क करून तात्काळ पंचनामे करण्यासाठी शेत बांधावर येण्याचा आग्रह धरल्याने स्पॉट पंचनामे करण्यात आले.याबद्दल सर्व शेतकरी बांधवांनी किसान काँग्रेसचे धन्यवाद व्यक्त केले.
याप्रसंगी शेतकरी महेंद्र ठाकरे,राकेश पाटील हिंगोन खुर्द गावाचे, पप्पु पाटील दोधवद ,कलाली येथील प्रमोद पाटील,राहुल पाटील प्रवीण भागवत पाटील,नरेंद्र बाबुराव,सुभाष डुबा,पंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी ठाकूर साहेब,कृषी अविनाश खैरनार,योगिता लांडगे,योगेश वंजारी,बियाणे कंपनी अधिकारी कृष्णा सुकासे आदी उपस्थित होते.