अमळनेर प्रतिनिधी येथील विधानसभा निवडणुकीच्या धामधूमी सुरु असताना,आता तालुक्यातील युवा नेतृत्व व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष तथा कु. उ. बा. समिती संचालक अमळनेर मा. सचिन बाळू पाटील (युवा संघर्ष योद्धा) यांनी विधानसभा लढण्याची इच्छा दर्शवत मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रदेश कार्यालय येथे थेट भेट देत मा.रवींद्र पवार (प्रदेश सरचिटणीस ) यांच्या कडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा अमळनेर विधानसभेचा उमेदवारी अर्ज दिला.सोबत अनंत निकम ही होते. तसेच येत्या काही दिवसात अमळनेर मतदार संघात मा. शरदचंद्र पवार यांचा जळगाव येथील पुढील दौऱ्यात अमळनेर येथे आवर्जून सभा घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
तालुक्याच्या राजकारणात सचिन पाटील यांच्या माध्यमातून एक युवा- प्रामाणिक झंजावते वादळ घोंगवणार अशी चर्चा युवका मध्ये होताना दिसते.