अमळनेर : खानदेश शिक्षण मंडळ संचालित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) इतिहास विभागातील संशोधक विद्यार्थ्यांनी नुकतीच मुंबई विधान भवन येथे भेट दिली.ही शैक्षणिक सहल इतिहास विभाग व राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.
प्रस्तुत शैक्षणिक सहलीस खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ.संदेश गुजराथी,कार्योपाध्यक्ष सी ए नीरज अग्रवाल,संस्थेचे चिटणीस तथा प्राचार्य अरुण बी.जैन सर यांनी तसेच मा. ना. दादासाहेब अनिल भाईदास पाटील (मंत्री मदत व पुनर्वसन, महाराष्ट्र शासन) यांनी या भेटी साठी संशोधकांना शुभेच्छा दिल्या.
मा.मंत्री साहेबांनी विधान भवन पाहणी, चहापान भोजन, निवास व्यवस्था आणि अभ्यास भेटीच्या सर्व स्तरावरील सुविधा उपलब्ध करून दिल्या. मा. दादांचे स्विय सहाय्यक श्री किशोर भाऊ, श्री सचिन पाटील यांनी भेटी दरम्यान नियोजन पूर्वक सहकार्य केले तसेच सचिवालयातील शासकीय अधिकारी आणि कर्मचारी वर्ग यांनी संशोधक विद्यार्थ्यांंना विधान भवनाची पूर्ण माहिती दिली.
यावेळी सभागृहात विधान सभा, विधान परिषद प्रत्यक्ष पाहणी करून सभागृहात बसण्याची अनुभुती संशोधकांना प्राप्त करून दिली तसेच शासकीय कामकाज बाबत, विधिमंडळ अधिवेशन काळातील कामकाज, विविध प्रस्ताव पारीत होण्यासाठी कामकाज स्वरुप याची सविस्तर माहिती अधिकारी वर्गाने दिली. या प्रसंगी संशोधकांनी अनेक प्रश्न विचारले, त्याबाबत विस्तृत माहिती देण्यात आले. यावेळी इतिहास विभाग प्रमुख प्रा.डॉ धनंजय चौधरी,प्रा.भाग्यश्री जाधव, प्रा.प्रसाद मुठे समवेत 28 संशोधक विद्यार्थी असे एकूण 31 व्यक्तीनी भेटीत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्ग, तसेच खान्देश शिक्षण मंडळाचे सर्व सन्मानीय पदाधिकारी, मा.प्राचार्य आणि मा. मंत्री महोदय ना. दादासाहेब श्री अनिल पाटील यांचे इतिहास विभागाच्या वतीने ऋण व्यक्त करण्यात आले.