महिला मंच तर्फे दि.१ रोजी डॉ निलेश चांडक यांच्या व्याख्यानाचे आयोजन…

अमळनेर प्रतिनीधी,येथील महिला मंच ट्स्ट च्या वतीने डॉ निलेश चांडक यांचेग व्याख्यानचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर व्याख्यानचा विषय “छातीच्या कॅन्सरची जनजागृती( ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस)” असा आहे.सदर कार्यक्रमात व्याख्यान स्लाईड शो द्वारे करण्यात येणार आहे.चाळीशीनंतर स्त्रियांना उद्भवणाऱ्या आरोग्याच्या बाबतीतल्या समस्यांचा विचार केला तर त्यात ब्रेस कन्सरचे प्रमाण अधिक दिसते.अशा वेळेला अजिबात न घाबरता डॉँक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक असते.याच पार्श्वभूमीवर कॅन्सर विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि आपण स्वताची तपासणी स्वताच कशी करावी, ह्याविषयी जाणून घेण्यासाठी अवश्य उपस्थित राहावे असे आवाहन महिला मंचच्या अध्यक्ष डॉ.अपर्णा मुठे, उपाध्यक्ष तिलोत्तमा पाटील, सचिव सरोज भांडारकर, कोषाध्यक्ष कांचन शहा,प्रकल्प प्रमुख-प्रा. शीला पारटील, वसुधरा लांडगे,पद्मजा पाटील,कार्यकारिणी सदस्य भारती गाला, विजया देसर्डा, उज्वला शिरोडे,करूणा सोनार, रंजना देशमुख, विद्या हजारे, माधुरी पाटील यांनी केले आहे.

कार्यक्रम दि-१आक्टोबर २०२४ मंगळवार,वेळ-दुपारी ४:३० वा.

ठिकाण-जिजाऊ जिम, स्टेट बँकेचा वरचा मजला,अमळनेर,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!