अबब…..वासरे ग्रामस्थांचे आरोग्य आले धोक्यात 

 

अमळनेर प्रतिनिधी,तालुक्यातील वासरे गाव सध्या घाणीच्या समस्यांनी ग्रस्त झाले आहे. गावकऱ्यांच्या मते, रस्ते आणि गटार पावसाच्या पाण्याने तुडूंब भरले असून, सर्वत्र स्वच्छतेची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे.

याबाबत गावातील गोकुळ हिलाल पाटील यांनी गटविकास अधिकार्यांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, गावाला घाणीच्या साम्राज्याने व्यापले असून, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिणामी, नागरिकांना रोजच्या कामांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

पाऊसाचे पाणी ठीक ठिकाणी साचलेले असल्याने डेंग्यू, टायफॉइड आणि मलेरियासारखे आजार पसरण्याची शक्यता वाढली आहे. यामुळे ग्रामस्थांनी करडी नजर न्युज कडे आरोग्याची चिंता व्यक्त केली आहे.या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन त्वरित उपाययोजना करण्याची मागणी निवेदनात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!