अमळनेर प्रतिनिधी, येथील राष्ट्रीय किसान काँग्रेसच्या वतीने मा.जिल्हाधिकारी जळगांव यांना ओला दुष्काळ जाहीर करावा म्हणून देण्यात आले निवेदन.
राष्ट्रीय किसान काँग्रेसच्या वतीने मा.जिल्हाधिकारी जळगांव यांच्याशी अमळनेर तालुक्यातील एकूण झालेला पाऊस पाहता ओला दुष्काळ जाहीर करावा या सह विविध विषयांवर चर्चा करून निवेदन देण्यात आले.
सदरच्या निवेदनात जिल्ह्यातील मंजूर पीकविमा वर्ग व्हायला उशीर होत आहे म्हणून व्याजा सह द्यावा लागेल असा नियम आहे,तसेच २०२४अतिवृष्टी मध्ये जिल्ह्यात ४०मंडळ मध्ये सरासरी पेक्षा १५०% पाऊस झाला यामुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातातुन गेला असल्याने ओला दुष्काळ जाहीर करा,कापुस,सोयाबीन अनुदान ज्यांच्या उताऱ्यावर नोंद झाली नाही ती करून मिळावी कारण शेतकऱ्यांनी पीक पेरले होते ,त्याचा पीकविमा घेतला होता तर त्यांना कापुस,सोयाबीन अनुदान मिळाले पाहिजे,2021खरीप हंगामात 8 सप्टेंबर आणि 18 ऑक्टोबर ह्या दिवशी अतिवृष्टी झाली पण त्याचे अनुदान मिळाले नाही त्यावर पण कोणाची आहे हे शोधले जावे,कलाली, दोधवद, हिंगोने, निंभोरा येथील टाटा ईशा बियाण्या मध्ये फसगत झालेल्या शेतकऱ्यानां भरपाई देऊन संबधित कंपनीवर कारवाई करावी,आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
याप्रसंगी राष्ट्रीय किसान काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रा सुभाष पाटील, डॉ अनिल शिंदे, कृ ऊ बा समितीचे संचालक सुरेश पाटील,धनगरदला पाटील, सत्तार मास्टर,प्रताप पाटील ,दिनेश पवार,समाधान कणखरे आदी सह शेतकरी उपस्थित होते.