अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त),सीटीएमसी मुंबई आणि राष्ट्रीय उच्च शिक्षा अभियान (RUSA) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *फॅशन डिझायनिंग प्रमाणपत्र* अभ्यासक्रमाचे उद्घाटन 16 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता संपन्न झाले.प्रस्तुत अभ्यासक्रमासाठी 150 विद्यार्थिनींनी नोंदणी केली असून हा अभ्यासक्रम दोन बॅचमध्ये मोफत असणार आहे.
या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण सीटीएमसी मुंबईच्या प्रा.गौरी येरुंकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिले जाणार आहे. विद्यार्थिनींना फॅशन डिझायनिंगच्या मूलभूत सिद्धांतांसह प्रत्यक्ष कौशल्य आत्मसात करण्याची संधी या अभ्यासक्रमाद्वारे उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थिनींना हा अभ्यासक्रम मोफत दिला जाणार आहे.
उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.बी.जैन हे अध्यक्षस्थानी होते, तर प्रमुख पाहुण्या म्हणून उपप्राचार्य डॉ. कल्पना पाटील,डॉ.मुकेश भोळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वंदना पाटील यांनी केले.
प्रस्तुत कार्यक्रमास सीटीएमसी मुंबईचे प्रा. सी. के.शर्मा आणि प्रा. गौरी एरुणकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. सदरच्या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रेरणा सोनवणे, प्रियांका पाटील आणि इरफान कुरेशी यांनी विशेष प्रयत्न केले.
फॅशन डिझाईन अभ्यासक्रम विद्यार्थिनींना फॅशन डिझायनिंग क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
अभ्यासक्रम समन्वयक डॉ.नलिनी पाटील यांनी प्रास्ताविक केले तर आभार प्रा.प्रतिभा पाटील यांनी मानले.