अमळनेर येथील वंचित आघाडी च्या वतीने परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची (उद्देश पत्रिका) तोडफोड व विटबना प्रकरणी कोंबिग ऑपरेशन करून अमानुषपणे मारहाण करणाऱ्या पोलीस निरीक्षक घोरबांड सह दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची निवेदनात केली मागणी.
भारतीय घटनेचे शिल्पकार भारत रत्न डॉ. बाबासाहेब अंबेडकर यांनी मोठ्या अथक परिश्रमाने देशाचे संविधान लिहले. राज्य घटनेत सर्व जाती धर्माना समान न्याय दिला म्हणून देशात एकात्मता अबधित आहे. असे असताना दि. 10 डिसेंबर 2024 रोजी परभणी येथे सोपान दत्तराव पवार या माथेफिरूने भारतीय
संविधानाची प्रतिकृतीची तोडफोड व विटंबना केली आहे. संविधानावर भारत देश चालतो आणि अश्या
संविधानाची महाराष्ट्रात विटंबना होणे म्हणजे एक शोकांतिका आहे. यामुळे जातीयवादी विकृती अज्ञान
मानसिकता पुढ़े आलेली आहे. सामाजिक एकोपास हानिकारक आहे. तसेच परभणी येथील – आंबेडकरी
वस्त्यामध्ये कोम्बींग ओपरेशन मध्ये निर्दोश तरुणांना उचलून खोटे गुन्हे दाखाल करुन अटक करण्यात आली. त्यामध्ये LLB चा विद्यार्थी परिक्षेसाठी आलेला सोमनाथ व्यंकट सुर्यवंशी यास पोलिसांनी कोबींग
कारवाईत अमानुष मारहाण करून त्यास आरोपी बनविले. तसेच जनावरांना पण कोणी एवढ्या निर्दयपणे मारहाण करत नाही, तेवढ्या क्रूरपणे कोबींगमध्ये पोलिसांनी सर्वाना मारहाण केली. पहिल्या दिवशी प्रचंड मारहाण झालेल्यांना पोलिसांनी मेडिकलसाठी दवाखान्यात घेऊन गेले नाहीत. उलट डॉक्टरांना पोलीस
ठाण्यात बोलावून त्या सर्वाचे मेडीकल केले. पोलिसांनी दहशत निर्माण करून आंबेडकरी वस्त्यात दोन
दिवस हैदोस घातला. त्यामध्ये सोमनाथ सुर्यवंशी या तरुणाचा पोलीस व्यवस्थेने बळी घेतला. लॉ चा
विद्यार्थी असणारा हा तरुण न्यायालयीन कोठडीत असतांना मरण पावतो ही एक गंभिर बाब आहे.सरकारला आंबेडकरी समाज आणि आंबेडकरी चळवळ यांना चिरड्न टाकायची आहे. त्यासाठी त्यांनी पोलिसांना एवढा फ्री हॅण्ड दिला. त्यामुळे सरकार आणि पोलिसांच्या कारवाईवर आमचा तसूभर विश्वास राहिलेला नाही. त्यासाठी तातडीने न्यायालयीन चौकशी करण्यात येवून पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड सह पोलिसातील गुंड्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व नि्दोष लोकांवरील खोटे गुन्हे मागे
घेण्यात यावे अन्यथा वंचित बहुजन आघाडी तर्फे तिव्र आंदोलन छेडण्यात येईल व होणाऱ्या परिणास आपले
सरकार जबाबदार राहील या आशयाचे निवेदन अमळनेर प्रांताधिकारी मुंडेवार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले.
याप्रसंगी तालुका अध्यक्ष दाजीबा गव्हाणे, महिला जिल्हाध्यक्ष मंगला ताई सोनवणे,भीमराव वानखेडे,पंकज वानखेडे, सचिन अहिर,मोहन बैसणे,मुकेश मैराळे,गुलाब कोळी,बापू भामरे,दिपक सैंदाने,मायताई सैंदाने, पोपट निकम,दिनेश सोनवणे,बायजाबाई भिल आदी कार्यकर्ते उपस्थित होते.